शेतकरी दाम्पत्याची विष प्राशन करून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:24 AM2021-07-10T04:24:28+5:302021-07-10T04:24:28+5:30

तालुक्यातील कारखेड येथील शेषराव भगवान मंजुळकर (वय ६०) आणि जनाबाई शेषराव मंजुळकर (५१) या शेतकरी दाम्पत्याने तिबार पेरणीचे संकट ...

Suicide by poisoning a farmer couple | शेतकरी दाम्पत्याची विष प्राशन करून आत्महत्या

शेतकरी दाम्पत्याची विष प्राशन करून आत्महत्या

Next

तालुक्यातील कारखेड येथील शेषराव भगवान मंजुळकर (वय ६०) आणि जनाबाई शेषराव मंजुळकर (५१) या शेतकरी दाम्पत्याने तिबार पेरणीचे संकट उद्भवल्याने आलेल्या नैराश्यातून आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेत ७ जुलैच्या रात्री विषारी औषध प्राशन केले होते. त्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान ८ जुलैच्या रात्री ९ व २ वाजण्याच्या सुमारास एकापाठोपाठ एक याप्रमाणे या शेतकरी दाम्पत्याची प्राणज्योत मालवली. मृत शेतकरी दाम्पत्याकडे केवळ दोन एकर शेती होती. गाठीशी असलेले सर्वकाही पणाला लावून त्यांनी पहिल्यांदा पेरलेले उगवले नाही. त्यामुळे उसनवारी करून दुबार पेरणी त्यांना करावी लागली होती. मात्र, दुसऱ्यांदाही पेरणी उलटल्याने हे शेतकरी दाम्पत्य तणावाखाली होते. त्यातच मृत जनाबाई मंजुळकर यांना अर्धांगवायूचाही त्रास होता. मात्र, कसेबसे जीवन कंठत असताना निसर्गाने घोर निराशा केल्याने आलेल्या नैराश्यातून त्यांनी विषारी औषध प्राशन करून जीवन संपविण्याचा निर्णय घेतला होता. मृत शेतकरी दाम्पत्यास दोन मुले व चार मुली आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Suicide by poisoning a farmer couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.