महिलेविरोधात आत्महत्येचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 01:36 AM2017-09-28T01:36:00+5:302017-09-28T01:36:34+5:30
खामगाव: अवैध सावकारीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या एका आरोपी महिलेने मच्छर मारण्याचे द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी संबंधित महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Next
ठळक मुद्देअवैध सावकारीच्या प्रकरणात एक महिला अटकेतआरोपी महिलेने मच्छर मारण्याचे द्रव्य प्राशन करून केला आत्महत्येचा प्रयत्न
खामगाव: अवैध सावकारीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या एका आरोपी महिलेने मच्छर मारण्याचे द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी संबंधित महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
व्याजाच्या पैशांची रक्कम अदा केल्यानंतरही सावकारांकडून पैशांसाठी तगादा लावल्या जात असल्याने, शहरातील जामोदे कुटुंबातील तिघांनी विष प्राशन केले. यात एकाचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या आणि पोलीस कस्टडीत असलेल्या सोनल प्रकाश गावंडे या महिलेने मच्छर मारण्याकरिता असलेले द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी कलम ३0९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला.
-