म्हैसवाडी येथील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 01:09 AM2018-03-18T01:09:05+5:302018-03-18T01:09:05+5:30

मलकापूर(जि.बुलडाणा) : तालुक्यातील मौजे म्हैसवाडी येथील एका ४५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Suicide by taking a toll on Mheswadi | म्हैसवाडी येथील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

म्हैसवाडी येथील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देबल्लीला दोर बांधून गळफास

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर(जि.बुलडाणा) : तालुक्यातील मौजे म्हैसवाडी येथील एका ४५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
याबाबत माहिती अशी, की रमेश राजाराम धाडे (वय ४५) रा. म्हैसवाडी याने शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास स्वत:च्या घरातील टिनाखाली बल्लीला दोर बांधून गळफास घेतल्याचे उघडकीस आले. ही बाब परिवारातील लोकांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यांना खाली उतरविण्यात आले; मात्र त्यांची प्राणज्योत मालवली होती. याप्रकरणी दिलीप किसन धाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी अप नं. ३/१८ कलम १७४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास एएसआय मोहनसिंग राजपूत करीत आहेत.

Web Title: Suicide by taking a toll on Mheswadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.