चिखली तालुक्यात कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 01:34 AM2017-12-27T01:34:41+5:302017-12-27T01:36:29+5:30

अमडापूर: येथून जवळच असलेल्या भोरसा-भोरसी येथील ४६ वर्षीय शेतकर्‍याने कर्जापायी स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली.

Suicides of debt-farming farmers in Chikhli taluka | चिखली तालुक्यात कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

चिखली तालुक्यात कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

Next
ठळक मुद्देराजू हिंमतराव कोरके असे मृत शेतकर्‍याचे नावशेतातील जांबाच्या झाडाला घेतला गळफास 

लोकमत न्यूज नेटवर्क
अमडापूर: येथून जवळच असलेल्या भोरसा-भोरसी येथील ४६ वर्षीय शेतकर्‍याने कर्जापायी स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली.
चिखली तालुक्यातील भोरसा-भोरसी येथील शेतकरी राजू हिंमतराव कोरके (वय ४६) यांच्याकडे रेणुका अर्बन बँक चिखलीचे ७५ हजार रुपये, स्टेट बँकेचे २५ हजार रुपये असे कर्ज असल्याने व शेतात नापिकी होत असल्याने असहय़ होऊन २६ डिसेंबर रोजी दुपारी स्वत:च्या शेतातील जांबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. मृतक राजू हिंमतराव कोरके यांच्याकडे 0.४0 आर जमीन असून, त्यांच्या पाठीमागे दोन मुले, पत्नी, आई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेची माहिती पांडुरंग हिरामण कोरके (वय ३७) यांनी दिल्यावरून कलम १७४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास पोहेकाँ ज्ञानदेव ठाकरे,शांता मगर करीत आहेत. 
 

Web Title: Suicides of debt-farming farmers in Chikhli taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.