जिल्ह्यात दोन शेतक-यांच्या आत्महत्या

By admin | Published: February 28, 2017 07:29 PM2017-02-28T19:29:53+5:302017-02-28T19:29:53+5:30

जिल्ह्यात गायगाव व सरंबा येथे दोन शेतक-यांची आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. देऊळगाव राजा तालुक्यातील

Suicides of two farmers in the district | जिल्ह्यात दोन शेतक-यांच्या आत्महत्या

जिल्ह्यात दोन शेतक-यांच्या आत्महत्या

Next
>ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 28 - जिल्ह्यात गायगाव व सरंबा येथे दोन शेतक-यांची आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली.
देऊळगाव राजा तालुक्यातील बायगाव बु. येथील सुधाकर कारभारी नागरे (वय ४०) या शेतक-याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. मृतक सुधाकर नागरे हे पोटाच्या आजारपणामुळे त्रस्त होते. दवाखान्यात उपचारही सुरू होते. मात्र तब्येतीमध्ये सुधारणा होत नव्हती. त्यांच्यावर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे थकीत कर्ज असल्याने नैराश्येपोटी त्यांनी टोकाची भूमिका
घेत राहत्या घरातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. घटनेचा तपास शाकीर पटेल करीत आहेत.  सरंबा येथील ४० वर्षीय शेतकरी गणेश सखाराम ताठे यांनी राहत्या घरी घराच्या छताला दोरीने आत्महत्या केली. सततची नापिकी, कर्जबाजारी तसेच ४ एकर कोरडवाहू शेती असून त्यांचेवर बुलडाणा सहकारी केंद्रीय बँकेचे कर्ज थकीत आहे. वाढता कर्जाचा डोंगरामुळे हतबल होवून
राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. विशेष म्हणजे १३ फेब्रुवारीला त्यांच्या मुलीचे लग्न झाले.

Web Title: Suicides of two farmers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.