लोणार तालुका होतोय सुजलाम् सुफलाम् ; २ लाख ६० हजार ब्रास गाळाचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 02:05 PM2018-04-03T14:05:58+5:302018-04-03T14:10:03+5:30

लोणार : गत तीन आठवड्यात लोणार तालुक्यातील सुजलाम् सुफलाम् या अभियानांतर्गत २ लाख ६० हजार ब्रास गाळ काढण्यात आलेला आहे. त्यामुळे ०.२६ दलघमी म्हणजे २६ कोटी लीटर पाण्याची वाढ होणार आहे.

Sujalam Sufalam, Lonar Taluka; 2 lakh 60 thousand brass soil remove | लोणार तालुका होतोय सुजलाम् सुफलाम् ; २ लाख ६० हजार ब्रास गाळाचा उपसा

लोणार तालुका होतोय सुजलाम् सुफलाम् ; २ लाख ६० हजार ब्रास गाळाचा उपसा

Next
ठळक मुद्दे सावंगी माळी तलावामधुन ३१ मार्च पर्यंत २० हजार घन मीटर गाळ काढण्यात आला आहे.त्यामुळे त्या तलावामध्ये ०.०२ दलघमी म्हणजेच २ कोटी लीटर पाण्याची वाढ होईल. ३१ मार्च पर्यंत चोरपांग्रा तलावातील १० हजार घन मीटर गाळ काढण्यात आला आहे.

लोणार : गत तीन आठवड्यात लोणार तालुक्यातील सुजलाम् सुफलाम् या अभियानांतर्गत २ लाख ६० हजार ब्रास गाळ काढण्यात आलेला आहे. त्यामुळे ०.२६ दलघमी म्हणजे २६ कोटी लीटर पाण्याची वाढ होणार आहे. सिचंन शाखा सुलतानपुर अंतर्गत तीन तालुक्यात नऊ तलाव येतात. त्यापैकी सुजलाम् सफलाम् बुलडाणा या अभियानाखाली मेहकर तालुक्यातील सावंगी माळी लघु पाटबंधारे तलावामधील जैन संघटनेने पुरविण्यात आलेल्या तीन जेसीबी द्धारे गाळ काढणे सुरू आहे. सावंगी माळी तलावामधुन ३१ मार्च पर्यंत २० हजार घन मीटर गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे त्या तलावामध्ये ०.०२ दलघमी म्हणजेच २ कोटी लीटर पाण्याची वाढ होईल. तसेच लोणार तालुक्यातील तीन तलावामध्ये गाळ काढणे सुरू आहे. त्यापैकी चोरपांग्रा लघु पाटबंधारे तलावामध्ये जैन संघटनेच्या दोन जेसीबी सुरू असुन ३१ मार्च पर्यंत चोरपांग्रा तलावातील १० हजार घन मीटर गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे या तलावात ०.०१ दलघमी म्हणजेच १ कोटी लीटर पाण्याची वाढ होईल. त्याचप्रमाणे खळेगाव लघु पाटबंधारे तलावामध्ये जैन संघटनेच्या चार जेसीबी व खाजगी २४ जेसीबी अशा एकुण २८ जेसीबी व ३३९ टॅÑक्टर सुरू असून खळेगाव तलावामधील ३१ मार्च पर्यंत २ लक्ष घन मीटर गाळ काढण्यात आलेला आहे. त्यामुळे खळेगाव तलावात ०.२० दलघमी म्हणजेच २० कोटी लीटर पाण्याची वाढ होईल. तसेच लोणार शहराला पाणी पुरवणारा बोरखेडी मिश्र लघु संग्राहक तलावामध्ये जैन संघटनेचे एक पोकलॅण्ड, पाच जेसीबी व ९५ ट्रॅक्टर सुरू असून बोरखेडी तलावात ३१ मार्च पर्यंत ५० हजार घन मीटर गाळ काढण्यात आलेला आहे. त्यामुळे बोरखेडी तलावात ०.०५ दलघमी म्हणजेच ५ कोटी लीटर पाण्याची वाढ झालेली आहे.

कामांची पाहणी

तालुक्यातील बोरखेडी धरणावर २ मार्च रोजी सुजलाम् सुफलाम् योजनेंतर्गत होत असलेल्या कामांची पाहणी करत शांतीलाल मुथा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी आ.डॉ. संजय रायमुलकर, उपविभागीय अधिकारी डॉ.नीलेश अपार, तहसिलदार सुरेश कव्हळे , शिवछत्र मित्र मंडळ अध्यक्ष नंदकिशोर मापारी, नगराध्यक्ष भूषण मापारी, कोअर कमिटीचे राजेश देशलरा, जितेंद्र जैन, जितेंद्र कोठारी, जयेश बाठिया, भिकमचंद रेदासनी, सुबोध संचेती, बीजेएसचे रामचंद्र कोचर, धरमचंद लुनिया, तुषार संचेती, मयूर राका, पवन सुराणा, संतोष सुराणा, सुशील डोंगरवाल तसेच गावकरी उपस्थित होते.

अजून पुढील तीन महिण्यात दोन दलघमी पाण्याची वाढ होईल असे ध्येय गाठण्यासाठी शेतकरी, जैन संघटना व शासन परिश्रम करीत राहील.

- एन. ए.बळी, शाखाधिकारी, सिंचन, शाखा सुलतानपुर.

Web Title: Sujalam Sufalam, Lonar Taluka; 2 lakh 60 thousand brass soil remove

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.