सुलतानपूर : नगर विकास आघाडीचे बहुमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:18 AM2017-10-10T00:18:43+5:302017-10-10T00:20:19+5:30
सुलतानपूर: संपूर्ण लोणार तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या सुलतानपूर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सुलतानपूर नगर विकास आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवित सरपंचपदी चंद्रकला नथ्थू अवचार यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सुलतानपूर: संपूर्ण लोणार तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या सुलतानपूर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सुलतानपूर नगर विकास आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवित सरपंचपदी चंद्रकला नथ्थू अवचार यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळविला.
यावेळी प्रथमच सरपंच पदाची निवड जनतेतून होती. तर सुल तानपूर ग्रा.पं. सरपंच पद हे मागासवर्गीय महिलेसाठी राखीव असल्याने अनेक उमेदवार बाशिंग बांधून होते. सरपंच पदासाठी कलावती रोडू अवचार, चंद्रकला नथ्थू अवचार, लक्ष्मीबाई शिवाजी अवचार, छाया कचरू पनाड, माला साहेबराव वानखेडे या पाच उमेदवारात चुरस असलीतरी, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात चंद्रकला नथ्थु अवचार व छाया कचरू पनाड यांच्यात सरळ लढत होऊन चंद्रकला नथ्थू अवचार यांनी २,४७३ मते मिळवित १,३५६ मताने दणदणीत विजय मिळविला. तर याच आघाडीचे १३ सदस्य विजयी झाले असून, माजी महिला व बालकल्याण सभापती आशा झोरे यांच्या समृद्धी ग्रामविकास आघाडीला ४ सदस्य संख्येवर समाधान मानावे लागले. सदर निवडणुकीत सुलतानपूर नगर विकास आघाडीने सरपंच पदासह स्पष्ट बहुमत प्राप्त केले.
या विजयाचे श्रेय आघाडीचे डॉ. हेमराज लाहोटी, वामनराव झोरे व मो. जमीर शे. हनीफ, अ. बशारत अ. सत्तार, मनोहर भाना पुरे, विजय खोब्रागडे तथा शे. आशकभाई यांना जाते.
विकास आघाडी पॅनलचा विजय
वडगाव तेजन: ग्रामपंचायत निवडणुकीत कृउबास सभापती शिव पाटील तेजनकर यांच्या विकास आघाडी पॅनलचा बहुमताने विजय झाला. तर लोणार तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष सदानंद पाटील तेजनकर यांच्या जनशक्ती ग्रामविकास आघाडीला हार पत्करावी लागली. सरपंचासह १0 पैकी ९ उमेदवार विजयी झाले. तर सरपंच पदासाठी शिव पाटील तेजनकर यांच्या पत्नी वर्षा शिवशंकर तेजनकर हय़ा बहुमताने विजयी झाल्या. तर विकास आघाडीचे सुरेश जाधव, गजानन आनंदराव, भागवत सिरसाट, मंजुळा मुरलीधर सवडतकर, कस् तुरा नारायण मानवतकर, पुष्पा प्रदीप तेजनकर, सरिता गजानन जाधव व संतोष पवार हे विजयी झाले. तर जनशक्ती विकास आघाडीचे एकमेव उमेदवार मंगल विनोद तेजनकर हय़ा विजयी झाल्या आहेत.