सोनोशी-पिंपरखेड जंगलात मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:36 AM2017-08-28T00:36:26+5:302017-08-28T00:36:26+5:30
सोनोशी: सोनोशी व पिंपरखेड या जंगलाची व्याप्ती मोठय़ा प्रमाणात आहे. जंगल संरक्षण करण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग आहे. वन समितीसुद्धा आहे. एवढे असतानासुद्धा शेकडो झाडांची कत्तल या जंगलात झाल्याचे उघड झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनोशी: सोनोशी व पिंपरखेड या जंगलाची व्याप्ती मोठय़ा प्रमाणात आहे. जंगल संरक्षण करण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग आहे. वन समितीसुद्धा आहे. एवढे असतानासुद्धा शेकडो झाडांची कत्तल या जंगलात झाल्याचे उघड झाले आहे.
जंगलात विविध प्रकारची झाडे आहेत; मात्र दररोज विविध प्रकारच्या झाडांची कत्तल होत आहे. तसेच काही ठिकाणी सागाची झाडे तोडल्याचे दिसत आहे. हे सर्व होत असताना वनरक्षक, वनरोजगार व सहायक कुठे असतात, असा प्रश्न निर्माण होत आहे. या जंगलात जनावरे चरण्यासाठी येतात, त्यामुळे ही बाब उघड झाली. तरी संबंधितांनी याकडे लक्ष देऊन सदर वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी होत आहे. अशा परिस्थितीत वन कर्मचारी मात्र जंगली प्राण्यांची भीती दाखवून कागदी घोडे नाचवतात व मोकळे होतात. जंगलात रोही हा एकमेव मोठा प्राणी आहे. जंगलात सुरक्षेचा प्रश्न वार्यावर असून, अधिकारी कोणतीच दखल घेत नसल्याने वृक्षतोड जोमात सुरू आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या ही सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळ्याच्या दिवसातही आग लागून जंगलातील सांगाची झाडे जळून खाक झाली होती.
जंगलामध्ये मी अध्यक्षासह पाहणी केली. त्यामुळे वृक्षतोड झाल्याचे दिसले असून, बाकी जंगल फिरणे बाकी आहे. मी अधिकार्यांकडे अतिरिक्त स्टाफची मागणी केली आहे. वनमजूर व सहायक यांना फोन करून जंगलात बोलाविण्याचा प्रयत्न केला; पण फोन लागत नाही व ते मला सहकार्यही करीत नाही. त्याबद्दल मी कार्यालयात माहिती दिली आहे.
- हंसराज डिवरे, वनरक्षक सोनोशी-पिंपरखेड