पुरवठा विभाग घेणार झाडाझडती

By admin | Published: September 11, 2014 11:39 PM2014-09-11T23:39:30+5:302014-09-11T23:39:30+5:30

लोकमत वृत्ताची दखल, घरगुती गॅसचा व्यावसायिक वा पराविरोधात पुरवठा विभाग तपासणी करणार.

The supply department will take care of the trees | पुरवठा विभाग घेणार झाडाझडती

पुरवठा विभाग घेणार झाडाझडती

Next

बुलडाणा : शहर परिसरात बिअर बारसह, हॉटेल, खानावळी, चहाटपरी, नाश्ता हातगाड्या आणि चायनिज सेंटरवर घरगुती गॅस सिलिंडरचा खुलेआम वापर होतो. ही बाब ह्यलोकमतह्ण वृत्त पत्राने उघडकीस आल्यानंतर या बातमीची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आज पुरवठा निरीक्षकांची झाडाझडती घेतली. असा अवैध प्रकार थांबविण्यासाठी पुरवठा निरीक्षक यांच्यासोबतच सर्व तहसीलदार यांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे.
शहरातील अनेक हॉटेलमध्ये १९.३ किलोचे कर्मशियल गॅस सिलिंडर ऐवजी घरगुती गॅस सिलिंडरचा अवैधरीत्या वापर मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. हा प्रकार लोकमतने ११ सप्टेंबर रोजी उघडकीस आणला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागाला खळबळून जाग आली. या बातमीची दखल घेत, याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी एस.बी.भराडे यांनी उद्या, १२ सप्टेंबर रोजी जिल्हाभरातील पुरवठा निरीक्षक आणि तहसीलदार यांची बैठक बोलावली असून, घरगुती गॅस वापर करणार्‍या व्यावसायीकांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे.

Web Title: The supply department will take care of the trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.