निराधार वृद्धाला दिला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:35 AM2021-07-27T04:35:41+5:302021-07-27T04:35:41+5:30
एक निराधार वृद्ध तीन दिवसांपुर्वी येथील गणेश शिंगणे यांच्या दुकानासमोर मंडपगाव रोडवर भर पावसात भिजत होते. त्यांना चालता येत ...
एक निराधार वृद्ध तीन दिवसांपुर्वी येथील गणेश शिंगणे यांच्या दुकानासमोर मंडपगाव रोडवर भर पावसात भिजत होते. त्यांना चालता येत नसावे, म्हणून काही युवकांनी त्यांना उचलून त्यांच्या दुकान समोर आणून ठेवले. शिंगणे यांनी व काही मित्रांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. आज आपण माणूस म्हणून समाजात जीवन जगत असताना आपल्याला समाजाचे काही देणे लागते, या भावनेने गणेश शिंगणे यांनी अशोक काकडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी तात्काळ त्या व्यक्तीला उपचारासाठी आम्ही आमच्या दिव्या फाऊंडेशन संस्थेमध्ये घेऊन येतो असे सांगितले. जीवन जगण्याचे सामर्थ्य यापेक्षा दुसरे काय. तुमच्या परिसरात जर असे गरजू लोकं ज्यांना खरच कोणी नाही, आशा व्यक्तींना मदत करा, असे आवाहन यावेळी दिव्या फाऊंडेशनकडून करण्यात आले. देऊळगाव मही येथे त्या रुग्णाला दिव्या फाऊंडेशनच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी गणेश शिंगणे, मधुकर शिंगणे, प्रदीप हिवाळे, गजानन दहातोंडे, दिव्या फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक काकडे व त्यांचे कर्मचारी, देऊळगाव मही येथील पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी
जगण्याची उमेद हारलेल्या त्या व्यक्तीला दिव्या फाऊंडेशनने जगण्याची उभारी दिली. सामाजिक बांधिलकी जपत त्याचे पुनर्वसन करण्याचा संकल्प घेतल्याने त्याच्यासाठी हे निश्चितच जीवनदान ठरावे असेच आहे.