राफेलच्या पुनर्विचार याचिकेवरील निकाल सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 05:05 AM2019-05-11T05:05:02+5:302019-05-11T05:06:18+5:30

सर्वोच्च न्यायालयाने राफेल सौद्याबाबत १४ डिसेंबर रोजी दिलेल्या निर्णयाच्या पुनर्विचारासाठी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि वकील प्रशांत भूषण यांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायालयाने शुक्रवारी निर्णय राखून ठेवला.

Supreme Court reserves the right to file a review petition on Raphael's plea | राफेलच्या पुनर्विचार याचिकेवरील निकाल सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून

राफेलच्या पुनर्विचार याचिकेवरील निकाल सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून

Next

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राफेल सौद्याबाबत १४ डिसेंबर रोजी दिलेल्या निर्णयाच्या पुनर्विचारासाठी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि वकील प्रशांत भूषण यांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायालयाने शुक्रवारी निर्णय राखून ठेवला.

डिसेंबरमध्ये दिलेल्या निकालात फ्रेंच कंपनी दसॉकडून ३६ राफेल विमाने खरेदी प्रकरणात एनडीए सरकारला न्यायालयाने ‘क्लीन चिट’ दिली होती. नंतर या प्रकरणातील सत्य मोदी सरकारने लपवून ठेवल्याचा आरोप भूषण यांनी केला होता. नंतर समोर आलेल्या कागदपत्रांआधारे निकालाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती तिघांनी केली होती.

राहुल गांधींबाबत नंतर निर्णय

मोदींना उद्देशून असलेले चौकीदार चोर हे वाक्य सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी घातल्याबद्दल या आधीच मी बिनशर्त माफी मागितली आहे. त्यामुळे भाजप नेत्या मीनाक्षी लेखी यांनी माझ्यावर दाखल केलेला न्यायालयीन अवमानाचा खटला संपविण्यात यावा या राहुल गांधी यांच्या अर्जावरील निकाल या पीठाने राखून ठेवला आहे. मीनाक्षी लेखी यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी न्यायालयास सांगितले की, गांधी यांची विनंती अमान्य करण्यात यावी. त्यांनी जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे.

Web Title: Supreme Court reserves the right to file a review petition on Raphael's plea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.