सुप्रिया सुळे यांनी साधला सृजन संवाद

By admin | Published: June 20, 2017 04:33 AM2017-06-20T04:33:23+5:302017-06-20T04:33:23+5:30

नागरिकांना भेडसावणार्‍या समस्या व यासोबतच विकास करण्याकरिता कराव्या लागणार्‍या उपाययोजनांचा उहापोह.

Supriya Sule has initiated the dialogue creation dialogue | सुप्रिया सुळे यांनी साधला सृजन संवाद

सुप्रिया सुळे यांनी साधला सृजन संवाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्हा तसेच राज्यातील विविध चर्चेतील मुद्दे, नागरिकांना भेडसावणार्‍या समस्या व यासोबतच विकास करण्याकरिता कराव्या लागणार्‍या उपाययोजनांचा उहापोह सोमवारी सकाळी खा. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आयोजित सृजण संवाद कार्यक्रमात झाला.
राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी बुलडाण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आ. हर्षवर्धन सपकाळ, बुलडाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक, श्रीकांत पिसे पाटील, जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. साहित्यिक नरेंद्र लांजेवार यांनी लेखिका ताराबाई शिंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ऐतिहासिक वास्तू उभारण्याची मागणी केली. त्यावर खा. सुळे यांनी एक समिती गठित करून कशाप्रकारे स्मृतीस्थळ उभारावे, याचा आराखडा तयार करा, त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे मागणी करू, असे आश्‍वासन दिले. यासोबतच पंजाबराव गायकवाड यांनी आशा वर्करसह कर्मचार्‍यांची कशी पिळवणूक होत आहे, हे मांडले. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांसाठी आश्रम चालविणारे अजय दराखे यांचा सत्कारही करण्यात आला. एड्सग्रस्त मुलांसाठी संपूर्ण राज्यात निवासी आश्रम उभारण्याची मागणी टाले यांनी केली. यावेळी शहरवासीयांनी विविध समस्या मांडल्या.

Web Title: Supriya Sule has initiated the dialogue creation dialogue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.