बुलडाणेकरांशी सुप्रिया सुळे यांचा सृजन संवाद
By admin | Published: June 19, 2017 01:11 PM2017-06-19T13:11:13+5:302017-06-19T13:11:13+5:30
राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी बुलडाण्यातील विविधक्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला.
बुलडाणा : जिल्हा तसेच राज्यातील विविध चर्चेतील मुद्दे, नागरिकांना
भेडसावणाऱ्या समस्या व यासोबतच विकास करण्याकरिता कराव्या लागणाऱ्या
उपाययोजनांचा उहापोह सोमवारी सकाळी खा. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत
आयोजित सृजण संवाद कार्यक्रमात झाला.
राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी बुलडाण्यातील विविध
क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री डॉ. राजेंद्र
शिंगणे, आ. हर्षवर्धन सपकाळ, बुलडाणा अर्बनचे संस्थापक राधेशाम चांडक,
श्रीकांत पिसे पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. साहित्यिक नरेंद्र
लांजेवार यांनी लेखिका तानुबाई बिरजे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ऐतिहासिक
वास्तू उभारण्याची मागणी केली. त्यावर खा. सुळे यांनी एक समिती गठीत करून
कशाप्रकारे स्मृतीस्थळ उभारावे याचा आराखडा तयार करा, त्यानंतर
मुख्यमंत्र्यांकडे मागणी करू, असे आश्वासन दिले. यासोबतच पंजाबराव
गायकवाड यांनी आशा वर्करसह विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची कशी पिळवणूक
होत आहे हे मांडले. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आश्रम
चालविणारे अजय दराखे यांचा सत्कारही करण्यात आला. एडसग्रस्त मुलांसाठी
संपूर्ण राज्यात निवासी आश्रम उभारण्याची मागणी टाले यांनी केली. तसेच
यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.