जिल्हा सामान्य रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:24 AM2021-07-15T04:24:23+5:302021-07-15T04:24:23+5:30
--अेापीडीही सुरूच-- कोरोनाचे संक्रमण वाढले होते तेव्हाही जिल्हा सामान्य रुग्णालयातील ओपीडी सुरू होती. मात्र, रुग्णांचे प्रमाण तुलनेने कमी होते. ...
--अेापीडीही सुरूच--
कोरोनाचे संक्रमण वाढले होते तेव्हाही जिल्हा सामान्य रुग्णालयातील ओपीडी सुरू होती. मात्र, रुग्णांचे प्रमाण तुलनेने कमी होते. आता ओपीडीमध्येही रुग्णसंख्या वाढली आहे. दिवसाला साधारणत: १०० च्या आसपास रुग्णांवर ओपीडीमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
--या शस्त्रक्रिया आहेत सुरू--
ऑर्थो, प्रसूती, कान, नाक, घसा, मोतीबिंदू यासह मोठ्या व अवघड शस्त्रक्रियाही जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू असल्याचे रुग्णालयीन सूत्रांनी सांगितले. मधल्या काळात ज्या शस्त्रक्रिया प्रसंगी लांबणीवर टाकल्या तरी अडचण नव्हती, अशा शस्त्रक्रियाही आता सुरू झाल्या असल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.
--नेत्र शस्त्रक्रियांचे प्रमाण घटले--
कोरोनामुळे यावर्षी नेत्र शस्त्रक्रियांचे प्रमाण घटले आहे. डोळ्यांचे इन्फेक्शन व कोरोनाची संवेदनशीलता पाहता हा वेग मंदावला आहे. या काळात अनेक जण डोळ्यांच्या तपासणीस येण्याचे टाळत असल्याचे निदर्शनास येत आहे. पूर्वी दररोज २० शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. त्याचे प्रमाण आता अवघे दोन ते चारवर आलेले आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी रुग्णालयात विक्रमी अशा शस्त्रक्रिया केल्या गेल्या होता. आतापर्यंत जवळपास ७०० शस्त्रक्रिया झाल्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला.
----
जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांवरील शस्त्रक्रिया नियमितपणे सुरू आहेत. कोरोनाच्या उच्चतम संक्रमणाच्या काळात काही शस्त्रक्रिया लांबणीवर टाकल्या गेल्या होत्या. मात्र, आता सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया सुरू आहेत. महिन्याकाठी साधारणत: रुग्णालयात १५० शस्त्रक्रिया होतात.
(डॉ. सुशील चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी, जीएचबी)