बाेंडअळींचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी सर्वेक्षण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:39 AM2021-08-12T04:39:16+5:302021-08-12T04:39:16+5:30
सध्या पिकांची पाहणी व निरीक्षणे घेतली असता कपाशीवर गुलाबी बोंडअळींचा प्रादुर्भाव दिसून येण्यास सुरुवात झालेली आहे़ शेतकऱ्यांनी गुलाबी ...
सध्या पिकांची पाहणी व निरीक्षणे घेतली असता कपाशीवर गुलाबी बोंडअळींचा प्रादुर्भाव दिसून येण्यास सुरुवात झालेली आहे़ शेतकऱ्यांनी गुलाबी बोंडअळींचा प्रादुर्भाव ओळखण्याच्या दृष्टिकोनातून नियमित सर्वेक्षण करावे, तसेच सर्वेक्षणाकरिता दोन कामगंध सापळे लावावेत तसेच आर्थिक नुकसानीची पातळी ओळखण्याकरिता आठ पतंग प्रति सापळा प्रति दिवस व सलग तीन दिवस किंवा एक अळी प्रति दहा फुले किंवा एक अळी प्रति दहा बोंड आढळल्यास पाच टक्के निंबोळी अर्क फवारणी करावी, असेही मासाळकर यांनी सांगितले़ त्यानंतर आवश्यकता भासल्यास रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी़
सोयाबीन पिकावर चक्रीभुंग्याचे आक्रमण
तालुक्यात साेयाबीन पिकावर काही प्रमाणात चक्रीभुंग्याचे आक्रमण झाले आहे़ मजुरांच्या साह्याने सुकलेले देठ व फांदी खुडून व गोळा करून नष्ट करावी तसेच प्रादुर्भाव वाढल्यास प्रोफेनोफोस अधिक सायपरमेथ्रीन या कीटकनाशकाची फवारणी घ्यावी़ तसेच मूग, उडीद पिकांवर कळी व फूल खाणारी व शेंगा पोखरणारी अळी मोठ्या प्रमाणात दिसत असून, तिने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडलेली दिसत आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आर. के. मासाळकर यांनी शेतकऱ्यांना केले आहे़