आपुले मरण पाहिले म्या डोळा; बचावलेल्या महिलेने अनुभवला थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 05:01 PM2021-07-17T17:01:07+5:302021-07-17T17:01:18+5:30

Khamgaon News : इमारत कोसळल्यानंतर परिसरातील युवकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत तिला बाहेर काढले.

Survied women experience death | आपुले मरण पाहिले म्या डोळा; बचावलेल्या महिलेने अनुभवला थरार

आपुले मरण पाहिले म्या डोळा; बचावलेल्या महिलेने अनुभवला थरार

Next

 - अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: ‘मृत्यू’ अटळ असला तरी जोपर्यंत तो समोर दिसत नाही तोपर्यंत तो जाणवतही नाही. मात्र, एकदा का तो समारे ठाकला आणि क्षणाक्षणाने जवळ येऊ लागला की, थोरा मोठ्यांची भंबेरी उडते.... दैव बलवत्तर  असले की प्राण पाखराचा बचाव होतो आणि विपरित परिस्थितीतही सर्वकाही सुरळीत होते...असाच प्रत्यय शुक्रवारी खामगावातील एका वयोवृध्द महिलेला आला. शिकस्त इमारत कोसळल्यानंतर परिसरातील युवकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत तिला बाहेर काढले. सुखरूप बाहेर पडल्यानंतर ‘आपुले मरण पाहिले म्या डोळा’ असेच शब्द त्या महिलेच्या ओठी उमटले.
- शुक्रवारी दुपारी साडे अकरा वाजताची वेळ... घरातील महिलांची चिल्या-पिल्यांना दोन घास भरविण्याची लगबग सुरू असतानाच, शिकस्त इमारतीच्या काही विटा आणि मलबा पडल्याचे निर्दशनास येते. घरातील प्रत्येकाची बाहेर पडण्यासाठी लगबग सुरू होते. वृध्द म्हातारी, चिमुकले आणि एक गृहीणी बाहेर पडताच. ठराविक अंतराने इमारतीचा काही भाग क्षणार्धात कोसळतो. घरात साहित्याची शोधाशोध करीत असलेली महिला अचानक संकटात सापडते. पडण्यापासून बचावलेल्या एका कोपºयाचा आसरा घेत  ती तिथेच थांबते. इतक्यात परिसरातील देवदूत मदतीला धावतात आणि संकटात सापडलेल्या महिलेला सुखरूप बाहेर काढतात.
सिनेमाच्या कथानकाला साजेशी एक घटना शुक्रवारी शारदाबाई प्रकाश चव्हाण(६३) यांच्यासोबत घडली. शिकस्त इमारत कोसळल्यानंतर केवळ दैव बलवत्तर म्हणून शारदाबाई चव्हाण यांचे प्राण वाचले. अन्यथा, शारदाबाईच्या बाबतीत विपरीत घडले असते. अशी चर्चा आता परिसरात होऊ लागली आहे. दरम्यान, याच घडनेत चव्हाण यांचे शेजारी असलेल्या मधुसुदन चुडीवाले यांच्या मालकीच्या एमएच २८ एआर ७२३९ या दुचाकीचा अक्षरक्ष: चुराडा झाला. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

 
परिवार बालंबाल बचावला!
वेळीच प्रसंगवधान राखून शिकस्त घरातून शुभांगी जितेंद्र चव्हाण, भक्ती जितेंद्र चव्हाण(६), आरोही जितेंद्र चव्हाण (३), सरस्वतीबाई जीवनलाल चव्हाण घराबाहेर पडल्या. त्यामुळे संपूर्ण परिवार बालंबाल बचावल्याची चर्चा आहे. तर जितेंद्र चव्हाण हे कामावर गेलेले असल्याने   पुढील अनर्थ टळला.

Web Title: Survied women experience death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.