आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचला, अपघातात गेला जीव; वाहनाच्या धडकेत गोरेगाव येथील येथील युवकाचा मृत्यू

By संदीप वानखेडे | Published: February 18, 2024 05:16 PM2024-02-18T17:16:05+5:302024-02-18T17:16:34+5:30

कुटुंबियांच्या निदर्शनास येताच त्याला रुग्णालयात दाखल केले.

Survived a suicide attempt, died in an accident A youth from Goregaon died in a collision with a vehicle | आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचला, अपघातात गेला जीव; वाहनाच्या धडकेत गोरेगाव येथील येथील युवकाचा मृत्यू

आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचला, अपघातात गेला जीव; वाहनाच्या धडकेत गोरेगाव येथील येथील युवकाचा मृत्यू

साखरखेर्डा: येथून जवळच असलेल्या गोरेगाव येथील एका युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब कुटुंबियांच्या निदर्शनास येताच त्याला रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना या युवकाने रुग्णालयातून धूम ठाेकली. पळून जात असताना त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली गंभीर जखमी झालेल्या या युवकाचा १८ फेब्रुवारी राेजी मृत्यू झाला गणेश विनायक पंचाळ असे मृतक युवकाचे नाव आहे.

गोरेगाव येथील गणेश विनायक पंचाळ यांचे पदविपर्यंत शिक्षण झाले होते. शिक्षण झाल्यानंतर वडिलांच्या सोबत शेतात काम करीत होते. चार एकर शेती , दोन भाऊ, आई वडील, भावाची मुले असा परिवार असतांना केवळ शेतीच्या तुटपुंज्या उत्पादनावर प्रपंचाचा गाडा कसा चालेल... या विवंचनेत गणेश पांचाळ यांनी १४ फेब्रुवारी रोजी शेतातच विषारी औषध प्राशन केले. ही बाब समाेर येताच त्यांना तातडीने त्याला साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

तेथे प्राथमिक उपचार करुन बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू प्रकृती चिंताजनक असल्याचे अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना १६ ला प्रकृतीत सुधारणा झाली. परंतू जिवनाला कंटाळलेल्या गणेशने उपचार सुरू असताना सलाईन, व इतर ठिकाणी लावलेल्या नळ्या काढून फेकल्या आणि रुग्णालयातून धूम ठोकली. पळताना एका अज्ञात वाहनाची धडक त्याला बसली. दरम्यान, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

उपचार घेण्यास दिला नकार
अपघातात गणेश पंचाळ यांचे दोन्ही पाय निकामी झाले. त्यांना पाेलिसांनी रुग्णालयात दाखल केले. त्याच्या अंगावरील रुग्णालयातील कपडे पाहून पोलीसही चकित झाले झाले. नेमका हा काय प्रकार आहे. तरीही पोलीसांनी शासकीय रुग्णालयात नेले. तेथे गेल्यानंतर संपूर्ण हकिकत पाेलिसांनी समजली. डाॅक्टरांनी पुन्हा उपचार सुरू केले. मात्र ते रुग्णालयात थांबायला तयार नव्हते. अखेर डॉक्टरांनी उपचार करुन कुटुंबाच्या स्वाधीन केले. वडील विनायक पंचाळ त्याला घरी घेऊन आले, आणि काळाने त्याच्यावर झडप घातली.

Web Title: Survived a suicide attempt, died in an accident A youth from Goregaon died in a collision with a vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.