जरांगे पाटलांची प्रतिमा रांगोळीतून साकारत मराठा आंदोलनाला दिला पाठिंबा
By निलेश जोशी | Published: November 1, 2023 07:11 PM2023-11-01T19:11:04+5:302023-11-01T19:11:24+5:30
आंतरवाली सराटी येथे त्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे हे आंदोलन चर्चेत आले होते
बुलढाणा: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले असून त्यास राज्यभरातून साखळी उपोषणासह रास्ता रोकोच्या माध्यमातून पाठिंबा मिळत आहे. दरम्यान बुलढाणा येथील सुष्मा शेखर देशमुख यांनी चक्क जरांगे पाटील यांचे रांगोळीतून छायाचित्र साकारत अनोख्या पद्धतीने त्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.
त्यामुळे सध्या बुलढाण्यात त्या चर्चेत आल्या आहेत. सलग दोन दिवसाच्या मेहनतीमधून त्यांनी गंगा पार्कमधील आपल्या घरी ही रांगोळी साकारली आहे. त्या मुळच्या बुलढाणा तालुक्यातील साखळी खुर्द येथील रहिवाशी असून गृहीणी आहेत. दरम्यान आपल्या शांततापूर्ण मार्गाने मराठा आरक्षणासाठी लढा देणारे जरांगे पाटील यांनी गोदा गाठच्या १०२ गावांतील नागरिकांच्या जात प्रमामपत्रासंदर्भाने सातत्यपूर्ण आंदोलन केले होते.
दरम्यान आंतरवाली सराटी येथे त्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे हे आंदोलन चर्चेत आले होते. त्याला सलक मराठा समाजाने मोठा पाठिबां दिला होता. दरम्यान मराठा आरक्षणाचा प्रश्न त्वरेने सोडवावा या मागणीसाठी ते पुन्हा उपोषणास बसेल आहे. त्याच्या समर्थनार्थ राज्यात सर्वत्र सकल मराठा समजााचा पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनामुळे सामाजिक आयकॉन बनलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आपणही पाठिंबा द्यावा अशी भावना सुष्मा शेखर देशमुख यांची होती. त्यातूनच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे छायाचित्र रांगोळीतून साकारले.