खामगावात स्क्रब टायफसचा संशयीत रुग्ण आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 01:37 PM2019-09-15T13:37:42+5:302019-09-15T13:37:47+5:30
५५ वर्षीय महिलेला स्क्रब टायफस आजाराची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : चिखली तालुक्यातील एका ५५ वर्षीय महिलेला स्क्रब टायफस आजाराची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेवर शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.
चिखली तालुक्यातील किन्ही सवडद येथील एका ५५ वर्षीय महिलेस ११ सप्टेंबर रोजी शहरातील एका खासगी रूग्णालयात भरती करण्यात आले. तपासणी केल्यानंतर रूग्ण महिलेच्या रक्ताची तपासणी स्थानिक पातळीवर करण्यात आली. मात्र, खामगावात योग्य ते निदान न झाल्याने, रूग्ण महिलेच्या रक्ताचे नमुने मुंबई येथे पाठविण्यात आले. मुंबई येथून या महिलेला ा टायफस’ या घातक आजाराची लागण झाल्याचे आढळून आले. दरम्यान, या रूग्ण महिलेवर आपल्या दवाखान्यात उपचार सुरू आहेत. सदर रूग्ण महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉ. सतिश गोरे यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य विभाग खळबळून जागा झाला असून, आरोग्य अधिकाऱ्यांनी किन्ही सवडद येथे योग्य ती उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.