बुलडाणा जिल्हा पुरवठा अधिका-यांसह निरीक्षण अधिकारी निलंबित
By Admin | Published: April 18, 2015 02:06 AM2015-04-18T02:06:04+5:302015-04-18T02:06:04+5:30
बोगस शिधापत्रिका प्रकरणात आणखी दोघांवर कारवाई.
बुलडाणा : बोगस रेशनकार्ड प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या तहसीलदार टेंभरे व पुरवठा निरीक्षक इंगळे या दोघांची गुरुवारी खामगावातून बदली करण्यात आली असून, याच प्रकरणात शुक्रवारी जिल्हा पुरवठा अधिकारी एस.बी. भराडी व त त्कालीन निरीक्षण अधिकारी फुके यांच्यावर निलंबनाची करावाई करण्यात आली आहे. खामगाव येथील तहसील कार्यालयातून वितरित झालेल्या बोगस रेशनकार्डांचा गोरखधंदा आ. भाऊसाहेब फुंडकर यांनी सभागृहासमोर उघड केला होता. रेशनकार्ड वितरणामधील या अनागोंदी कारभाराबाबत खामगावचे तहसीलदार टेंभरे व पुरवठा निरीक्षक यांच्यावर पुरवठा मंत्री यांनी निलंबनाची घोषणा होऊन या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, याच प्रकरणाचे पडसाद जिल्हा प्रशासकीय वतरुळातही उमटले असून, जिल्हा पुरवठा अधिकारी एस.बी. भराडी व तत्कालीन निरीक्षण अधिकारी फुके यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. याच प्रकरणात गुरुवारी खामगाव येथील पुरवठा कार्यालयातील लिपिक संजय पारखेडकर यांनाही निलंबित करण्यात आले होते, हे विशेष.