अपात्रता प्रकरणामध्ये अपर आयुक्तांकडून स्थगिती

By admin | Published: September 20, 2016 12:13 AM2016-09-20T00:13:07+5:302016-09-20T00:13:07+5:30

दिवठाणा येथील उपसरपंचासह एका सदस्याचा अपात्रता प्रकरणातील निर्णयावर अपर विभागीय आयुक्ताने स्थगन आदेश दिला.

Suspension by the Additional Commissioner in the matter of disqualification | अपात्रता प्रकरणामध्ये अपर आयुक्तांकडून स्थगिती

अपात्रता प्रकरणामध्ये अपर आयुक्तांकडून स्थगिती

Next

चिखली(जि. बुलडाणा), दि. १९: दिवठाणा येथे ग्रा.पं.सदस्यांना कुठलीही संधी न देता अपात्र करण्यात आल्यामुळे सदर निर्णयावर स्थगनादेश मिळावा, हा युक्तीवाद ग्राह्य धरत अपर विभागीय आयुक्त अमरावती यांनी उपसरपंच व सदस्यांच्या अपात्रतेला स्थगनादेश दिला.
दिवठाणा येथील ग्रा.पं. सदस्यांना विहीत कालावधीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे; परंतु ग्रा.पं.सदस्यांनी सदर जात प्रमाणपत्र सादर न केल्याने २५ जुलै २0१६ पर्यंंतचा अल्टीमेटम संपल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.विजय झाडे यांनी ७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील २२८ ग्रा.पं.सदस्यांना अपात्र ठरविले होते. जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाला आव्हान देत दिवठाणा येथील उपसरपंच विलास सोनाजी वसु व ग्रा.पं.सदस्य निता किशोर मोरे यांनी व जिल्हा न्यायालयातील अँड.डी.के.राऊत यांच्या मार्फत अमरावती आयुक्त कार्यालयात दाद मागितली. १५ सप्टेंबर रोजी प्रकरणावर युक्तिवाद होऊन त्यांच्या अपात्र करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली.

Web Title: Suspension by the Additional Commissioner in the matter of disqualification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.