विश्‍वासमत लपविण्यासाठी निलंबन

By admin | Published: November 14, 2014 11:16 PM2014-11-14T23:16:52+5:302014-11-14T23:16:52+5:30

बुलडाणा येथे पत्रकारपरिषद, जनतेच्या दरबारात खरे सत्य मांडणार असल्याचे निलंबित आमदार बोंद्रे यांचे मत.

Suspension to hide confidentiality | विश्‍वासमत लपविण्यासाठी निलंबन

विश्‍वासमत लपविण्यासाठी निलंबन

Next

बुलडाणा : अल्प मतात असलेले भाजपा सरकारने विश्‍वासदर्शक ठराव प्रचंड गोंधळात आवाजी मतदानाने जिंकला आहे. मात्र या ठरावाच्या वेळी जनतेसोबत विश्‍वासघात झाला. खरे सत्य लपवले ही बाब जनतेसमोर येवू नये, जनतेचे लक्ष विचलीत व्हावे, म्हणून जाणीवपुर्वक काँग्रेसच्या आमदारांचे निलंबन केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. स्थानिक जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अलका खंडारे, निलंबीत आमदार राहुल बोंद्रे, बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी संयुक्तरित्या सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. जिल्हाध्यक्ष अंभोरे यांनी सरकारची प्रवृत्ती ही फॅसीस्ट आहे. मत व्यक्त करण्याची संधी न देण्याची भूमिका दडपशाहीची असल्याचे सांगून येणार्‍या काळात काँग्रेसच्या वतीने सरकारचे खरे स्वरूप जनतेसमोर मांडले जाईल, असे सांगितले. आ.बोंद्रे यांनी संपूर्ण घटनाक्रम विषद केला. सरकारने धोकेबाजी करून विश्‍वासमत जिंकले आहे. आम्ही धक्काबुक्की केली नाही उलट आमदार गिरीष महाजनसह अनेक भाजपा आमदारांनी गोंधळ घातल्याचा आरोप केला.

Web Title: Suspension to hide confidentiality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.