दोन मुद्रांक विक्रेत्यांवर निलंबनाची कारवाई

By admin | Published: August 11, 2015 11:58 PM2015-08-11T23:58:41+5:302015-08-11T23:58:41+5:30

‘स्वाभिमानी’ने केले स्टिंग ऑपरेशन; जादा दराने केली स्टॅम्प विक्री.

Suspension proceedings on two stamp vendors | दोन मुद्रांक विक्रेत्यांवर निलंबनाची कारवाई

दोन मुद्रांक विक्रेत्यांवर निलंबनाची कारवाई

Next

चिखली (जि. बुलडाणा) : कृषी कर्ज तसेच महसूल संदर्भातील इतर महत्त्वपूर्ण कामांसाठी शेतकरी तसेच शाळा, महाविद्यालयीन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मोठय़ा प्रमाणावर स्टॅम्प पेपरची आवश्यकता निर्माण झाल्याने या बाबीचा गैरफायदा घेत येथील मुद्रांक विक्रेत्यांकडून जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री होत आहे. ही बाब स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कॅमेराबद्ध करून याबाबत येथील सहदुय्यम निबंधकांकडे रितसर तक्रार दाखल केल्यामुळे जादा दराने मुद्रांकाची विक्री करणार्‍या दोन मुद्रांक विक्रेत्यांचा परवाना मंगळवारी निलंबित करण्यात आला आहे. तालुक्यातील शेतकर्‍यांना गत महिन्यात कृषी कर्ज तसेच इतर महत्त्वपूर्ण बाबींसाठी तर शालेय विद्यार्थ्यांना मोठय़ा प्रमाणावर स्टॅम्प पेपरची गरज होती. ही बाब हेरून येथील काही मुद्रांक विक्रेत्यांनी स्टॅम्पचा तुटवडा असल्याचे भासवित सर्वसामान्य शेतकरी व विद्यार्थ्यांकडून १00 च्या स्टॅम्पपेपरवर २0 ते ३0 रुपये अतिरिक्त वसूल करणे सुरू होते. ही बाब शेतकर्‍यांनी स्वाभिमानीच्या पदाधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी स्टिंग ऑपरेशन राबविले, प्रत्यक्ष अतिरिक्त रुपये देऊन स्टॅम्प विक्रीचे चित्रीकरण केले व सदर चित्रीकरणाची ह्यव्हिडिओ सी.डी.ह्णसह रितसर तक्रार विनायक सरनाईक, भारत वाघमारे, गोपाल ढोरे आदी कार्यकर्त्यांनी येथील सहदुय्यम निबंधक वर्ग २ यांच्याकडे केली. दरम्यान, ह्यस्वाभिमानीह्णने कॅमेराबद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये तुळशीराम गाढवे व ङ्म्रीधर देशमुख हे दोन मुद्रांक विक्रेते अतिरिक्त रुपये घेऊन मुद्रांकाची विक्री करताना आढळून आल्याने त्यांना दोषी ठरवून सहदुय्यम निबंधकांनी तुळशीराम गाढवे व ङ्म्रीधर देशमुख या दोन मुद्रांक विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले आहे; तसेच दोन्ही मुद्रांक विक्रेत्यांना तहसील आवारात बसण्यास मज्जाव केला असून, नोंदवहीनुसार शिल्लक असलेला मुद्रांकांचा साठा संपेपर्यंतच मुद्रांकाची विक्री करण्यात यावी व तद्नंतर नोंदवही कार्यालयात जमा करण्याचे आदेश सहदुय्यम निबंधकांनी जिल्हा निबंधकांच्या निर्देशानुसार दिले आहे.

Web Title: Suspension proceedings on two stamp vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.