युवकाचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 01:02 AM2017-09-29T01:02:15+5:302017-09-29T01:02:15+5:30
खामगाव : येथील एका २२ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी ३.३0 वाजता शहरातील रावणटेकडी भागात घडली. घराच्या छतावर सचिन राजू कुंदेटकर (२२) हा युवक काम करीत होता. अचानक तो बेशुद्ध पडला. त्यामुळे नातेवाइकांसह सहकार्यांनी त्याला उपचारार्थ उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी या युवकाची तपासणी केली असता, मृ त घोषित केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : येथील एका २२ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी ३.३0 वाजता शहरातील रावणटेकडी भागात घडली.
घराच्या छतावर सचिन राजू कुंदेटकर (२२) हा युवक काम करीत होता. अचानक तो बेशुद्ध पडला. त्यामुळे नातेवाइकांसह सहकार्यांनी त्याला उपचारार्थ उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी या युवकाची तपासणी केली असता, मृ त घोषित केले. त्यामुळे या युवकाचा वाटेतच मृत्यू झाल्याची शंका उपस्थित होत असून, प्रत्यक्षदश्रीच्या सांगण्यावरून सदर युवक वीज कोसळल्यामुळे ठार झाल्याची चर्चा आहे. सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांनी सदर युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
चिखला येथील महिलेचा विहिरीत पडून मृत्यू
बिबी : चिखला काकड येथील एका ४0 वर्षीय महिलेचा विहिरी त पडून मृत्यू झाल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाज ताच्या सुमारास घडली. सुबिद्राबाई मारोती शिंगोरे ही महिला िपण्याच्या पाण्यासाठी गावाजवळच असलेल्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली होती. दरम्यान तिचा अचानक तोल जावून ती विहिरीत पडली. हा प्रकार ग्रामस्थांना समजताच गावकर्यांनी सदर महिलेस वाचविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, उपचारार्थ बिबी ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.