अनुराधा फार्मसीचे डी.फार्ममध्ये सुयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:36 AM2021-09-03T04:36:30+5:302021-09-03T04:36:30+5:30
बीटीई कोड १८६५ चा निकाल देखील ९८ टक्के लागला असून यामध्ये ८३ विद्यार्थी प्रथम, तर ५ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह ...
बीटीई कोड १८६५ चा निकाल देखील ९८ टक्के लागला असून यामध्ये ८३ विद्यार्थी प्रथम, तर ५ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी डी.फार्म (०२९९) च्या अंतिम वर्षामध्ये महाविद्यालयातून सय्यद समीर याने ९१.८० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला आहे. शुभम कौश्कर ९०.७० टक्के द्वितीय, शुभमसिंह ठाकूर ९०.२० टक्के तृतीय, अरुण मुढे ८९.८० टक्के चतुर्थ आणि अश्विनी तायडे हिने ८८.६० गुणांसह पाचवा क्रमांक पटकाविला आहे. प्रथम वर्षाच्या परीक्षेत अतीश साखरे ८९.०९ प्रथम, शेख शहबाज शेख मुश्ताक ८९.०९ द्वितीय, शेख इम्रान शेख इद्रिस ८८.०९ तृतीय, वैभव सुसर ८७.९१ चतुर्थ आणि ऋषिकेश काब्रा याने ८७.३६ गुण मिळवून महाविद्यालयातून पाचवा क्रमांक मिळविला आहे. अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी बीटीई कोड १८६५ मधून डी.फार्म अंतिम वर्षामध्ये अक्षय शिंदे याने ९५.२० टक्के गुणांसह महाविद्यालयातून प्रथम, मनीषा शिंदे ९१.५० टक्के द्वितीय, रेणुका पांडुरंग म्हस्के ९१.४० तृतीय, मनीषा देशमुख ९१.३० टक्के चतुर्थ आणि धनश्री काळे हिने ९०.३० टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकाविला आहे. प्रथम वर्षामधे मुक्ता लोंखडे ९२.२७ टक्के प्रथम, शेख समीर शेख झाकीर ९१.४६ द्वितीय, खुशबू श्यामसुंदर राठी ८९.१८ तृतीय, निकिता शर्मा ८८.८२ चतुर्थ, वैभव बोंद्रे याने ८८.७३ टक्के गुण मिळवून महाविद्यालयातून पाचवा क्रमांक मिळविला. डी.फार्म परीक्षेत महाविद्यालयाने मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे, सचिव तथा माजी आ. राहुल बोंद्रे, उपाध्यक्ष डॉ.व्ही.आर.यादव, विश्वस्त सिद्धेश्वर वानेरे, सलिमोद्दीन काजी, आत्माराम देशमाने, अनंतराव सराफ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.आर.बियाणी, प्राचार्य डॉ.आर.एच.काळे, प्राचार्य डॉ.आर.आर.पागोरे यांनी कौतुक केले.