सुजलाम सुफलाम बुलडाणा - खासगी ‘जेसीबी’ मालक, शांतिलाल मुथा यांच्यात चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 01:12 AM2018-03-05T01:12:22+5:302018-03-05T01:12:22+5:30

बुलडाणा :  सुजलाम सुफलाम योजनेंतर्गत बुलडाणा जिल्हय़ातील  धरणातील गाळ काढण्याचा उपक्रम भारतीय जैन संघटना व  प्रशासनाच्यावतीने हाती घेतला आहे. त्यासाठी त्यांनी १३४ जेसीबी व ९  पोकलेन आणले आहेत; मात्र तरीही जिल्हय़ातील खासगी जेसीबी  मालकांना वार्‍यावर सोडणार नसून, त्यांनाही या कामात सामावून घेत  त्यांनाही काम देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी शनिवारी बुलडाणा येथे झालेल्या कार्यक्रमात दिली.

SUZLAUM SUPLAAM BULDADA - A discussion between the private 'JCB' owner, Shantilal Mutha | सुजलाम सुफलाम बुलडाणा - खासगी ‘जेसीबी’ मालक, शांतिलाल मुथा यांच्यात चर्चा

सुजलाम सुफलाम बुलडाणा - खासगी ‘जेसीबी’ मालक, शांतिलाल मुथा यांच्यात चर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देरविकांत तुपकर यांची यशस्वी मध्यस्थी

लोकमत न्यूज नेटवर्क 
बुलडाणा :  सुजलाम सुफलाम योजनेंतर्गत बुलडाणा जिल्हय़ातील  धरणातील गाळ काढण्याचा उपक्रम भारतीय जैन संघटना व  प्रशासनाच्यावतीने हाती घेतला आहे. त्यासाठी त्यांनी १३४ जेसीबी व ९  पोकलेन आणले आहेत; मात्र तरीही जिल्हय़ातील खासगी जेसीबी  मालकांना वार्‍यावर सोडणार नसून, त्यांनाही या कामात सामावून घेत  त्यांनाही काम देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी शनिवारी बुलडाणा येथे झालेल्या कार्यक्रमात दिली.
 खासगी जेसीबी व पोकलेन मालक व भारतीय जैन संघटनेचे संस्थापक  अध्यक्ष शांतिलाल मुथा यांच्यात  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे  नेते रविकांत तुपकर यांनी मध्यस्थी करून चर्चा घडवून आणली.  रविकांत तुपकर यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे खासगी जेसीबी व  पोकलेन मालकांचा प्रश्न निकाली निघाला.  भारतीय जैन संघटनेद्वारे  दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत बुलडाणा जिल्हा सुजलाम  सुफलाम करण्यासाठी भारतीय जैन संघटना व प्रशासनाच्यावतीने  जिल्हय़ातील लहान-मोठय़ा धरणातील गाळ काढून पाण्याची संचय  क्षमता वाढविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचा  नुकताच ३ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय  भूपृष्ठ वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत शुभारंभ  झाला. 
विशेष म्हणजे, हा गाळ काढण्याचा उपक्रम राबविण्यासाठी भारतीय जैन  संघटनेने जिल्हय़ात तब्बल १३४ जेसीबी मशीन व नऊ पोकलेन  आणले आहेत. या मशीनद्वारे हे गाळ काढण्याचे काम होणार आहे;  मात्र एकाच वेळी एवढय़ा जेसीबी व पोकलेन मशीन बुलडाणा  जिल्हय़ात आल्याने खासगी जेसीबी मालकांवर उपासमारी येणार  असल्याची भीती होती. जिल्हय़ातील जेसीबी व पोकलेन मालकांनी  संघटित होऊन आमच्यावर उपासमारीची वेळ आली, अशी जाहीरपणे  भूमिका घेऊन स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांची जेसीबी मालक  विनोद जंजाळ, अमोल राऊत, प्रशांत आढाव, दिलीप देशमुख, कुणाल  मोरे, राजू राजपूत, भुसारी, विलास अंभोरे यांच्यासह शिष्टमंडळाने भेट  घेतली.  हा गंभीर प्रश्न त्यांच्या कानावर घातला. रविकांत तुपकर यांनी  लगेच या उपक्रमाचे प्रमुख व जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शां ितलाल मुथा यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा प्रश्न घातला. यावर  शांतिलाल मुथा यांनीसुद्धा खासगी जेसीबी मालकावर अन्याय होणार  नाही, असे सांगितले होते.  ३ मार्च रोजी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस  बुलडाण्यात आले असताना रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री यांच्या  कानावर ही बाब  घातली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या  भाषणात हा मुद्दा उपस्थित करून जिल्हय़ातील खासगी जेसीबी  मालकांवर बेरोजगाराची वेळ येऊ देणार नाही, त्यांनासुद्धा या उपक्रमात  सहभागी करून घेत त्यांच्या मशीनलासुद्धा काम देण्याची ग्वाही त्यांनी  भाषणातून दिली. रविकांत तुपकर यांनी पुढाकार घेत खासगी जेसीबी व  पोकलेन मालकांची बाजू शांतिलाल मुथा व मुख्यमंत्र्यांकडे  मांडल्यामुळे खासगी जेसीबी मालकाचा प्रश्न निकाली निघेल, एवढे  मात्र खरे.
 

Web Title: SUZLAUM SUPLAAM BULDADA - A discussion between the private 'JCB' owner, Shantilal Mutha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.