चारा छावण्यासाठी 'स्वाभिमानी' आक्रमक; तहसीलदाराच्या दालनात 'झोपा काढो' आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 02:42 PM2019-05-16T14:42:07+5:302019-05-16T14:42:25+5:30
चारा छावण्या कधी उभारता हे विचारण्यासाठी शेकडो स्वाभिमानी सह शेतकरी तहसील कार्यालयात दाखल झाले.
लोकमत न्युज नेटवर्क
खामगाव: बुलडाणा जिल्ह्यात आदेश असताना चारा छावण्या अजून सुरू झाल्या नाहीत तर चारा छावण्या साठी निवेदने,उपोषण करण्यात आले. दरम्यान गुरुवारी चारा छावण्या कधी उभारता हे विचारण्यासाठी शेकडो स्वाभिमानी सह शेतकरी तहसील कार्यालयात दाखल झाले. परंतु समाधान कारक उत्तर न मिळाल्याने स्वाभिमानी ने चक्क तहसीलदार यांच्या दालनात झोपा काढो आंदोलन सुरू करण्यात आले. सर्वच कार्यकर्ते कार्यालयात झोपल्याने एकच धांदल उडाली. जो पर्यंत चारा छावण्या मिळणार नाही तो पर्यन्त झोपा इथंच झोपा काढू असा इशारा स्वाभिमानी कडून देन्यात आला आहे. चारा च्या अभावी असंख्य जनावरे मारत आहेत.अश्या परिस्तिथी मध्ये चारा छावण्या गरजेच्या होत्या तरी या शासनाने अजून चारा छावण्या उभ्या केल्या नाही. त्यामुळेय तहसीलदार यांच्या कार्यलयात झोपा काढो आंदोनल सुरू करण्यात आले. या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत.