"स्वाभिमानी"चे नेते रविकांत तुपकर यांनी घेतली शेतक-यांच्या कुटूंबाची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 04:57 PM2017-10-06T16:57:53+5:302017-10-06T16:58:01+5:30
बुलडाणा : स्वाभिमानाचे नेते रविकांत तुपकर व प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ.प्रकाश पोपळे यांनी यवतमाळ येथील मृत शेतकऱ्यांच्या परिवारांची भेट घेतली.
रविकांत तुपकर व प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ.प्रकाश पोपळे यांनी कलगाव ता. दिग्रस येथे जावून किटकनाशकांच्या फवारणी मुळे मृत शेतकरी शेख आयूब भाई यांच्या परिवाराची भेट घेतली व फवारणीमुळेच अंधत्व आलेले शेतकरी रमेश गायकवाड व प्रवीण मनवर यांच्या परिवारची भेट घेतली त्यांच्या परिवाराला आधार दिला. कृषी केंद्रावर कोणतीही कारवाई न केल्यामुळे व ढिसाळ यंत्रणेने कही हालचाली न केल्यामुळे रविकांत तुपकर संतप्त झाले व यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना रविकांत तुपकरांनी चांगलेच खडसावले.
मूत शेतकऱ्यांना किमान 5 लाख रु मदत मिळावी -रविकांत तुपकर
यावेळी नायब तहसीलदार,कृषी अधिकारी,तलाठी,ग्रामसेवक तसेच "स्वाभिमानी"चे यवतमाळ जिल्हाध्यश मनिष जाधव, अमरावती चे जिल्हाध्यश अमित अढ़ावु बुलडाण्याचे नेते श्याम अवथळे पाटील व नितीन राजपुत पुसद चे तालुकाध्यश विष्णु लांडगे उपस्थित होते. यावेळी कलगाव येथील उपस्थित ग्रामस्था सोबत रविकांत तुपकरांनी ग्रामपंचायतमध्ये संवाद साधला.