खामगाव ते अकोला महामार्गावर स्वाभिमानीचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:16 PM2018-10-20T12:16:35+5:302018-10-20T12:35:45+5:30

खामगाव: शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी सकाळी ११ वाजता खामगाव ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर टेभूर्णा फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

swabhimani protest on Khamgaon to Akola highway | खामगाव ते अकोला महामार्गावर स्वाभिमानीचा रास्ता रोको

खामगाव ते अकोला महामार्गावर स्वाभिमानीचा रास्ता रोको

Next

खामगाव: शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी सकाळी ११ वाजता खामगाव ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर टेभूर्णा फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे याच्या नेतृत्वात हा रास्तारोको करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी संघटीत झाल्यामुळे त्यांना न्याय मिळाला. त्याप्रमाणे विदर्भातील शेतकºयांना सुध्दा न्याय मिळावा, यासाठी रास्तारोको करण्यात आला. भाजपा सरकार शेतकरी विरोधी असल्याने सोयाबीन व कापसाला भाव मिळत नसल्याचा आरोप यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबतच आंदोलनात सहभागी शेतकºयांनी केला. शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी आणि जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, सोयाबीन तसेच कपाशीला हमीभाव द्यावा, शेतकºयांना हेक्टरी ५०  हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, तुर, उडीद व हरभºयाचे चुकारे तातडीने द्यावे, आॅनलाईनच्या गोंधळामुळे मागील वर्षी पिकविमा भरू न शकलेल्या शेतकºयांना ५० टक्के रक्कम द्यावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. रास्तारोको आंदोलनात स्वाभीमानीचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांच्यासह ३० ते ४० पदाधिकारी व शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. यावेळी पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. थोड्या वेळाने वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Web Title: swabhimani protest on Khamgaon to Akola highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.