नागपूर-अैारंगाबाद मार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्का जाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 11:33 AM2021-03-20T11:33:03+5:302021-03-20T11:33:03+5:30

Swabhimani Shetkari Sanghatana's agitation स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन छेडले आहे.

Swabhimani Shetkari Sanghatana's Chakka Jam agitation on Nagpur-Ayrangabad road | नागपूर-अैारंगाबाद मार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्का जाम आंदोलन

नागपूर-अैारंगाबाद मार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्का जाम आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : घरगुती वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीज खंडित करण्याची अन्यायकारक मोहीम त्वरित थांबवावी. लॉकडाऊन काळातील वीज देयके माफ करावी, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन छेडले आहे. त्याअंतर्गत  स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात नागपूर ते औरंगाबाद महामार्गावर तालुक्यातील पेठ फाट्यावर ‘चक्काजाम’ आंदोलन करण्यात आले.  त्यामुळे तब्बल अडीच तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
दरम्यान, महावितरणने वीज देयक माफ करावे आणि वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबवावी अन्यथा मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री निवासस्थानाचाही वीजपुरवठा खंडित करून त्यांच्या परिवारांनाही अंधारात चाचपडायला भाग पाडू, असा इशारा रविकांत तुपकर १९  मार्च रोजी या आंदोलनादरम्यान दिला. आक्रमक तुपकरांनी आंदोलनाचा इशारा देताच पोलीस प्रशासन अलर्ट होते. आंदोलनादरम्यान तैनात असलेल्या फौजफाट्यावरून त्याची तीव्रता दिसून आली.  दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात राज्यभरात  सध्या उपरोक्त दोन्ही मागण्यांसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे जिल्हाही ढवळून निघाला. आंदोलनादरम्यान बैलगाड्या रस्त्यावर आडव्या लावण्यात आल्या होता. सकाळपासूनच स्वाभिमानीचे कार्यकर्ते या मार्गावर ठाण मांडून बसले होते. महावितरणला मागणी मान्य करणे शक्य नसले तर त्यांनी शेतकऱ्यांची वीज कट करूनच दाखवावी, आम्ही मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्याच्या निवासस्थानाची वीज कापू असा इशाराच या आंदोलनातून तुपकरांनी दिला.  आंदोलनामध्ये नितीन राजपूत, विनायक सरनाईक, सुधाकर तायडे, रामेश्वर अंभोरे, संतोष शेळके, भारत खंडागळे, अनिल चव्हाण, रविराज टाले, गणेश थुट्टे,  रमेश कुटे  सहभागी झाले होते.

Web Title: Swabhimani Shetkari Sanghatana's Chakka Jam agitation on Nagpur-Ayrangabad road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.