स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नागपूर-अैारंगाबाद मार्गावर चक्का जाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:33 AM2021-03-20T04:33:46+5:302021-03-20T04:33:46+5:30
दरम्यान, महावितरणने वीज देयक माफ करावे आणि वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबवावी अन्यथा मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री निवासस्थानाचाही वीजपुरवठा ...
दरम्यान, महावितरणने वीज देयक माफ करावे आणि वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबवावी अन्यथा मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री निवासस्थानाचाही वीजपुरवठा खंडित करून त्यांच्या परिवारांनाही अंधारात चाचपडायला भाग पाडू, असा इशारा रविकांत तुपकर १९ मार्च रोजी या आंदोलनादरम्यान दिला. आक्रमक तुपकरांनी आंदोलनाचा इशारा देताच पोलीस प्रशासन अलर्ट होते. आंदोलनादरम्यान तैनात असलेल्या फौजफाट्यावरून त्याची तीव्रता दिसून आली. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात राज्यभरात सध्या उपरोक्त दोन्ही मागण्यांसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे जिल्हाही ढवळून निघाला. आंदोलनादरम्यान बैलगाड्या रस्त्यावर आडव्या लावण्यात आल्या होता. सकाळपासूनच स्वाभिमानीचे कार्यकर्ते या मार्गावर ठाण मांडून बसले होते. महावितरणला मागणी मान्य करणे शक्य नसले तर त्यांनी शेतकऱ्यांची वीज कट करूनच दाखवावी, आम्ही मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्याच्या निवासस्थानाची वीज कापू असा इशाराच या आंदोलनातून तुपकरांनी दिला. आंदोलनामध्ये नितीन राजपूत, विनायक सरनाईक, सुधाकर तायडे, रामेश्वर अंभोरे, संतोष शेळके, भारत खंडागळे, अनिल चव्हाण, रविराज टाले, गणेश थुट्टे, रमेश कुटे, अमोल तिडके सहभागी झाले होते.
--तर भडका उडेल--
जिल्ह्यातील नागरिक व शेतकरी लॉकडाऊनच्या कठीण परिस्थितीतून बाहेर आले आहे. आता सरकार लॉकडाऊन करणार, घरातच थांबवणार, उद्योगधंदेही सुरू होऊ देणार नाही असे जर सांगितल्या जात असले तर कशाच्या आधारावर ही देयके भरावीत असा प्रश्न या आंदोलनादरम्यान तुपकर यांनी उपस्थित केला होता. आघाडी सरकरमधील मंत्र्यांमध्येच समन्वय नाही. आमच्या संयमाचा अंत पाहू नका अन्यथा संघर्षाची व्यापकात वाढेल, असा इशारा तुपकरांनी दिला. अंचरवाडी येथे रास्ता रोको दरम्यान तालुकाध्यक्ष संतोष परिहार, गणेशसिंह परिहार, प्रकाश रंगनाथ परिहार, परमेश्वर सखाराम परिहार यांना अंढेरा पोलिसांनी स्थानबध्द केले होते.