महावितरणच्या कार्यालयात स्वाभिमानीचे ठिय्या आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:18 AM2017-11-16T00:18:37+5:302017-11-16T00:36:30+5:30
बुलडाणा : शेतकर्यांच्या वीज पंपाचे कनेक्शन खंडित करण्यात येऊ नये; तसेच जे कनेक्शन कट केले ते तातडीने जोडून देण्यात यावे, या मागणीसाठी १४ नोव्हेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शेतकर्यांच्या वीज पंपाचे कनेक्शन खंडित करण्यात येऊ नये; तसेच जे कनेक्शन कट केले ते तातडीने जोडून देण्यात यावे, या मागणीसाठी १४ नोव्हेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी वीज कर्मचार्यांनी खुपगाव कोलारा ये थील शेतकर्यांचे कट केलेले कनेक्शन पुन्हा जोडून दिले. त्यानंतर हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
मागील काही दिवसांपासून अनेक शेतकर्यांनी रब्बीची पेरणी करून पिके जमिनीवर आली आहेत. त्यामुळे या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे; परंतु गेल्या काही दिवसांपासून थकीत बिलाच्या नावाखाली वीज कंपनीने शेतकर्यांच्या कृषी पंपाचे कनेक्शन कट करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे विहिरीत पाणी असूनही शे तकर्यांना त्याचे सिंचन करता येत नाही. त्यामुळे रब्बी उत्पादक शेतकरी कमालीचा त्रस्त झाला आहे. सोमवारी वीज कर्मचार्यांनी खुपगाव कोलारी येथील काही शेतकर्याचे वीज कनेक्शन कट केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांसह शेतकर्यांनी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धाव घेऊन ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी स्वाभिमानीचे राणा चंदन यांनी शेतकर्याचे कट केलेले वीज कनेक्शन तातडीने जोडून देण्यात यावे, अन्यथा कार्यालयाची वीज बंद करून या ठिकाणीच मुक्काम करण्यात येईल, असा इशारा दिला. या इशार्याची दखल घेऊन वीज अधिकार्यांनी तातडीने दोन्ही गावातील शेतकर्यांची लाइन जोडून दिली. त्यानंतर हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात असंख्य शेतकर्यांनी सहभाग घेतला होता.
बुलडाणा येथील वीज कार्यालयात ठिय्या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले होते.