बोंड अळीच्या अनुदानासाठी 'स्वाभीमानी'चा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 12:33 PM2018-09-04T12:33:04+5:302018-09-04T12:33:47+5:30
खामगाव : ‘बोंडअळी ’ अनुदानाची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यास टाळाटाळ करणाºया बँकेविरोधात सोमवारी माटरगाव येथे स्वाभीमानीच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत बँकेने सोमवारी सायंकाळी ६ वाजता शेतकºयांच्या खात्यात रक्कम जमा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क

शेगाव तालुक्यातील शेतकºयांच्या बोंडअळी अनुदानाचे पैसे बँकेकडे आल्यावर देखील बॅक महाराष्ट्रच्या माटरगाव शाखेकडून दिले जात नव्हते. याबाबत सुरूवातीला निवेदन देण्यात आले. मात्र, निवेदनाची दखल न घेण्यात आल्याने स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांच्या नेतृत्वात सोमवारी बँकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत बँक प्रशासनाने ५५ लक्ष रुपयांचे अनुदान शेतकºयांच्या खात्यात जमा करून हजर असलेल्या शेतकºयांना सायंकाळी ६ वाजेपर्यंत अनुदानाच्या पैशाची वाटप करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला आले मोठे यश मिळून शेतकºयांना दिलासा मिळाला. यावेळी संचालन गजानन राऊत यांनी केले तसेच उपस्थितांपैकी तालुका अध्यक्ष अनिल मिरगे, पोलीस पाटील दिलीपभाऊ देशमुख, दिनेश तांबटकर, गणेश बेलूरकर, संजय वानखडे, अजीज खान ( गुड्डू ) यांनी उपस्थित शेतकºयांना मार्गदर्शन केले. या आंदोलनात शेतकºयांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.