वाढीव वीज देयकांविरुद्ध स्वाभिमानीचे उद्या आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:34 AM2021-03-18T04:34:52+5:302021-03-18T04:34:52+5:30

यावेळी बोलताना डॉ. ज्ञानेश्वर टाले म्हणाले की, आम्ही गेल्या वर्षापासून लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले माफ करा, अशी मागणी ...

Swabhimani's protest against increased electricity bills tomorrow | वाढीव वीज देयकांविरुद्ध स्वाभिमानीचे उद्या आंदाेलन

वाढीव वीज देयकांविरुद्ध स्वाभिमानीचे उद्या आंदाेलन

Next

यावेळी बोलताना डॉ. ज्ञानेश्वर टाले म्हणाले की, आम्ही गेल्या वर्षापासून लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले माफ करा, अशी मागणी करत आहोत. मात्र राज्य सरकार झोपेचे सोंग घेत आहे. कोरोनाच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट सुरू आहे. मंत्र्यांचे बंगले सजवायला यांच्याकडे पैसे आहेत. मात्र सर्वसामान्यांना वीज बिलात सवलत द्यायला पैसे नाहीत, असेही ते म्हणाले. चक्का जाम आंदोलनाला सर्व पक्षीयांनी सामील व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल बोरकर, तालुका अध्यक्ष प्रफुल्ल देशमुख, पक्षाचे तालुका अध्यक्ष नितीन अग्रवाल, वि.आ. अध्यक्ष अमोल धोटे, अल्प.आ.हबीब भाई,शहर अध्यक्ष अशफाक शहा, ता. उपाध्यक्ष गणेश जुनघरे, अल्प.आ. उपाध्यक्ष अफरोज भाई, अरुण मुधळकर,सचिन मेंटागळे,विष्णू आखरे,देवाभाऊ आखाडे,गोलू सदावर्ते, गौतम सदावर्ते, कैलास ऊतपुरे,गोपाल सुरडकर,उत्तम खरात,याकुब भाई,गणेश धाबे, धन्यकुमार खिल्लारी, ओम ठोकळ, देवानंद खोडके,सना खान,गणेश मोरे आदी उपस्थित हाेते.

Web Title: Swabhimani's protest against increased electricity bills tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.