कामगार अधिकारी यांना ‘स्वाभिमानी’चा घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:35 AM2021-03-17T04:35:26+5:302021-03-17T04:35:26+5:30
जिल्हा कामगार कार्यालयामध्ये कामगारांना दावा (क्लेम) दाखल करण्यासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असून कार्यालयातील अेाळखपत्र प्रिंटींग मशीनही गेल्या ...
जिल्हा कामगार कार्यालयामध्ये कामगारांना दावा (क्लेम) दाखल करण्यासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असून कार्यालयातील अेाळखपत्र प्रिंटींग मशीनही गेल्या १५ दिवसापासून बंद आहे. त्यामुळे कामगारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कामगारांना आपले काम सोडून मजुरी बुडवून या कार्यालयाकडे चकरा माराव्या लागतात तसेच कार्यालयात कुठलेही नियोजन नसून कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कार्यालयात ढिसाळ नियोजन आहे. कार्यालय प्रमुखांचे यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे कार्यालय मध्ये नेहमी गोंधळ होतो अशा तक्रारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व काही कामगारांनी हे कार्यालय १६ मार्च रोजी गाठले होते. दरम्यान २०१७ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या कार्यालयातील समस्यांसंदर्भात जिल्हाधिकारी यांचीही भेट घेऊन त्यांना प्रकरणी येथील समस्या व कामगारांचे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी करणार असल्याचेही यावेळी राणा चंदन, जिल्हा अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले, गौतम सदावर्ते, महेंद्र जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी सांगितले.