जलतरण स्पर्धेत मार्मडे यांना ४ सुवर्ण, २ रौप्य पदक
By admin | Published: September 29, 2016 01:34 AM2016-09-29T01:34:53+5:302016-09-29T01:34:53+5:30
तिस-या राष्ट्रीय मास्टर्स अँक्वॅटिक चॅम्पियनशिप स्पर्धांंमध्ये बुलडाण्यातील जलपटूचे यश.
बुलडाणा, दि. २८- तेलंगाणा मास्टर्स स्विमींग असोसिएशनतर्फे हैद्राबाद येथे आयोजित केलेल्या तिसर्या राष्ट्रीय मास्टर्स अँक्वॅटिक चॅम्पियनशिप २0१६ हय़ा जलतरण स् पर्धांंमध्ये स्थानिक राजे छत्रपती कला महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण संचालिका प्रा.डॉ.कामीनी मार्मडे यांनी नेत्रदिपक कामगिरी करत ४ सुवर्ण व रौप्य पदके प्राप्त केली आहेत.
मार्मडे त्यांना ५0 मिटर फ्रि स्टाईल, १00 मिटर फ्रि स्टाईल, ४0 मिटर ब्रेस्ट स्ट्रोक, आणि ५0 मिटर बटर फ्लाय मध्ये ४ सुवर्ण पदके तर ४ बाय ५0 मिटर फ्री स्टाईल करणे व ४ बाय ५0 मिटर मिडले रिलेमध्ये प्रत्येकी एक रौप्य पदक मिळाले आहे. त्या अविरत परिङ्म्रमातून व सातत्यामधून त्यांना ही कामगिरी करता आली.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष विजयराज शिंदे त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत व सत्कार केला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.शशीकांत सिरसाठ, प्रा.डॉ.गोविंद गायकी, प्रा.डॉ.भगवान गरुडे, प्रा.डॉ.शाहेदा नसरीन, प्रा.विजय मोरे, प्रा.डॉ.महेश रिंढे, प्रा.दिपक लहासे, प्रा.स्वप्निल दांदडे, प्रा.डॉ.गजानन वानखेडे, प्रा.डॉ.नितीन जाधव उपस्थित होते.