ओव्हर फ्लो प्रकल्पांमध्ये पोहणे ठरतेय जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:22 AM2021-07-19T04:22:34+5:302021-07-19T04:22:34+5:30

दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न बुलडाणा : तालुक्यातील काही गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतकडे वारंवार ...

Swimming in overflow projects is life threatening | ओव्हर फ्लो प्रकल्पांमध्ये पोहणे ठरतेय जीवघेणे

ओव्हर फ्लो प्रकल्पांमध्ये पोहणे ठरतेय जीवघेणे

googlenewsNext

दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न

बुलडाणा : तालुक्यातील काही गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतकडे वारंवार निवेदनेद देऊनही कुठलीही कारवाई करण्यात येत नाही. अनेक ठिकाणी पाइप लाइन, व्हॉल्व्ह लिकेज झालेला असल्याने गढूळ पाणी येत आहे.

मोठे वाहन मुख्य रस्त्यावर येण्यास अडचणी

बुलडाणा : अमडापूरवरून साखरखेर्ड्याकडे जाताना अंडर ब्रिजमधून मोठे वाहन मुख्य रस्त्यावर येऊ शकत नाही. हीच परिस्थिती साखरखेर्ड्यावरून चिखलीकडे येताना मोठी वाहने वळण घेतानाही अडचणी आहेत. त्यामुळे एखादेवेळेस मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी

सिंदखेड राजा : तालुक्यात मागील दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

व्हायरल फिव्हरच्या रुग्णसंख्येत वाढ

धाड : मागील काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. हीच लक्षणे कोरोनाची असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खाजगी आणि शासकीय रुग्णालयात व्हायरल फिव्हरच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे.

रेती घाटांचे दर १५ दिवसांनी मोजमाप

बुलडाणा : रेतीचोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता रेती घाटांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. रेती घाटांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावून रेतीघाट सुरक्षित करावे. या घाटांचे दर १५ दिवसांनी मोजमाप करून अहवाल घ्यावा, अशा सूचना खा. प्रतापराव जाधव यांनी एका बैठकीत दिल्या आहेत.

मोकाट गुरांमुळे वाहतुकीस अडथळा

बुलडाणा : परिसरात गत काही दिवसांपासून मोकाट गुरे रस्त्यावर फिरत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या गुरांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. शनिवारी दोन तास माेकाट गुरे बसस्थानकासमोर ठाण मांडून बसलेले होते.

Web Title: Swimming in overflow projects is life threatening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.