जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा पुन्हा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:22 AM2017-09-12T00:22:29+5:302017-09-12T00:22:57+5:30
परिसरात स्वाइन फ्लूचा पुन्हा उद्रेक झाला असून, खामगावातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अन्य तिघांवर अकोल्यात उपचार सुरू आहेत. त्यामुळे आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: परिसरात स्वाइन फ्लूचा पुन्हा उद्रेक झाला असून, खामगावातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अन्य तिघांवर अकोल्यात उपचार सुरू आहेत. त्यामुळे आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संसर्गजन्य असलेला स्वाइन फ्ल्यू जिल्हय़ात झपाट्याने पसरत आहे. मागील घटनांमध्ये एक संशयित व एक लागण झालेला रुग्ण दगावला. आजपर्यंत काही रुग्णांच्या घशातील द्रवाचे नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. अकोला सवरेपचार रुग्णालयामध्ये स्वाइन फ्लू रुग्णांकरिता असलेल्या विशेष कक्षात खामगाव परिसरातून आलेल्या तीन संशयित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. एच १, एन १ आजारांच्या विषाणूचे वहन वराहाकडून होत असले तरी विद्यमान स्थिती त हे संक्रमण मॅन टू मॅन संसर्गामुळे वाढत आहे. रोगाची लागण ही मधुमेही, अतिरिक्त दाबाचे रुग्ण, गरोदर स्त्रिया व प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना त्वरित होते. त्यामुळे अशा व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. स्वाइन फ्ल्यूचे निदान रुग्णांच्या थुंकी तपासणीतूनच होते. ही त पासणी एनआयव्ही नागपूर किंवा पुणे येथेच होते. सदर रुग्णांचे सॅम्पल घेऊन तपासणीकरिता पाठविण्यात येते. यामुळे रुग्णाचे योग्य निदान होण्यात कालावधी जातो. त्यामुळे अशा रुग्णांची तातडीने तपासणी व्हावी व आवश्यक चाचण्यांकरिता आरोग्य प्रशासनाने हायटेक यंत्रणा राबवावी, अशी मागणी होत आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
लक्षणे आढळताच करावा उपचार
बाधित रुग्णांच्या नाकातील व घशातील स्त्राव, त्याचा घाम, थुंकी यामधून या आजाराचे संक्रमण होते. ताप येणे, खोकला येणे, घसा दुखणे, नेहमी अतिसार, उलट्या होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, मांसपेशी दुखणे, अंगदुखी, डोके दुखणे, औषधोपचारानंतर ताप कमी न होणे अशी लक्षणे आढळताच रुग्णाला सवरेपचार रुग्णालयातील विशेष कक्षात दाखल करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
लोणार तालुक्यातही संशयिताचा मृत्यू
लोणार तालुक्यातील खुरमपूर येथील तरुणाचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याच्या चर्चेने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. लोणार तालुक्यातील खुरमपूर येथील तरुण शे तकर्याला आठ दिवसांपूर्वी ताप आला होता. त्यामुळे त्यांच्यावर लोणार मेहकर येथील खासगी रुग्णालयात प्रथमो पचार केल्यानंतर त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी सदर रुग्णाला स्वाइन फ्लू असल्याचा संशय व्यक्त करून उपचाराला सुरुवात केली होती; मात्र उपचारादरम्यान या शेतकर्याचा मृ त्यू झाला.