तलवारने केक कापणे भोवले; बर्थडे बॉय गजाआड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 06:56 PM2021-06-03T18:56:55+5:302021-06-03T18:57:16+5:30

Khamgaon News : तलवारीने केक कापणे आणि नाचगाणे सुरू असतानाच शहर पोलिसांनी त्याला अटक केली.

The sword swung to cut the cake; Birthday Boy arested at Khamgaon | तलवारने केक कापणे भोवले; बर्थडे बॉय गजाआड!

तलवारने केक कापणे भोवले; बर्थडे बॉय गजाआड!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: मित्रांसोबत वाढदिवस साजरा करताना तलवारीने केक कापणे एका बर्थ बॉयच्या चांगलेच अंगलट आले. तलवारीने केक कापणे आणि नाचगाणे सुरू असतानाच शहर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याचवेळी त्याचे मित्र घटनास्थळावरून फरार झाल्याने, बिचाºया एकट्यावरच ‘नको रे बाप्पा म्हणत’ गजाआड होण्याची वेळ आली.
- स्थानिक बाळापूर फैलातील सुदर्शन गेट जवळ उशीरारात्री वाढदिवस साजरा केल्या जात आहे. याठिकाणी तलवारीने केक कापणे आणि नाचगाणे सुरू असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे शहर पोलिस घटनास्थळी धडकले असता रोहण संजय बामनेट (१८) रा. बाळापूर फैल, मनिष हट्टेल, जय धुंदलेकर, अनुराग महातो, अंजिक्य हवेलिया वाढदिवस साजरा करताना दिसून आले. दरम्यान, पोलिसांना पाहून चौघांनी घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी शहर पोलिसांनी रोहण बामनेटसह चौघां विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५, भादंवि कलम १८८, २७९, २७०, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१(ब), साथरोग अधिनियम कलम ०३ आणि महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात आली.
 

 
स्थानिक बाळापूर फैल भागात तलवारीने केक कापल्या जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी एकास अटक केली आहे. त्याच्यासह साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-सुनिल अंबुलकर
शहर पोलिस निरिक्षक, खामगाव.
 

Web Title: The sword swung to cut the cake; Birthday Boy arested at Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.