शेतकर्‍यांना देणार आत्महत्या न करण्याची शपथ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:06 AM2017-08-25T00:06:49+5:302017-08-25T00:07:16+5:30

बुलडाणा: सततची दुष्काळी परिस्थिती व शासनाच्या शे तकरीविरोधी धोरणामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबता थांबेना त. यावर्षी पुन्हा खरिपाच्या हंगामात पावसाने दडी मारल्याने  िपकांची स्थिती गंभीर झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना  मानसिक आधाराची गरज असल्यामुळे जिल्हय़ातील गणेश  मंडळांमध्ये जाऊन आरतीच्यावेळी गोळा झालेल्या शेतकर्‍यांना  आत्महत्या न करण्याची शपथ घ्यायला लावण्याचा अभिनव उ पक्रम स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे राबविण्यात येणार आहे. 

Sworn to give farmers the right to suicide! | शेतकर्‍यांना देणार आत्महत्या न करण्याची शपथ!

शेतकर्‍यांना देणार आत्महत्या न करण्याची शपथ!

Next
ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी संघटना राबवणार उपक्रमशेतकर्‍यांना मानसिक आधाराची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: सततची दुष्काळी परिस्थिती व शासनाच्या शे तकरीविरोधी धोरणामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबता थांबेना त. यावर्षी पुन्हा खरिपाच्या हंगामात पावसाने दडी मारल्याने  िपकांची स्थिती गंभीर झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना  मानसिक आधाराची गरज असल्यामुळे जिल्हय़ातील गणेश  मंडळांमध्ये जाऊन आरतीच्यावेळी गोळा झालेल्या शेतकर्‍यांना  आत्महत्या न करण्याची शपथ घ्यायला लावण्याचा अभिनव उ पक्रम स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे राबविण्यात येणार आहे. 
यासोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्‍चिम विदर्भ प्रमुख राणा  चंद्रशेखर चंदन यांनी प्रत्येक गणेश मंडळाने शेतकर्‍यांना परिस्थि तीशी लढण्याचे बळ देऊन शपथ देण्याचे आवाहनही केले आहे.   यावर्षी पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांचे उभे पीक वाळत आहे.  नुकताच झालेल्या पावसाने पिके कसेबसे तग धरून आहेत; मात्र  अजूनही मोठय़ा प्रमाणावर पावसाची गरज आहे. सोयाबीन,  उडीद, मूग व कपाशी पिके उद्ध्वस्त झाले आहेत. सोयाबीन,  उडीद, मूग, कपाशी या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन  नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस  यांच्याकडे नुकतीच वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तु पकर  यांनी केली आहे. 
तथापि, अद्याप शासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही, अशी  खंत व्यक्त करून राणा चंदन यांनी गणेशोत्सव मंडळांनी शे तकर्‍यांना बळ देण्याकरिता प्रत्यत्न करण्याचे आवाहन केले. 

Web Title: Sworn to give farmers the right to suicide!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.