लक्षणे नसलेले ठरताहेत धाेकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:34 AM2021-04-16T04:34:48+5:302021-04-16T04:34:48+5:30
नातेवाईक ठरताहेत काेराेना वाहक काेविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या पाॅझिटिव्ह रुग्णांना नातेवाइक भेटायला येत आहेत़ पुढे हेच नातेवाईकच काेराेनाचे ...
नातेवाईक ठरताहेत काेराेना वाहक
काेविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या पाॅझिटिव्ह रुग्णांना नातेवाइक भेटायला येत आहेत़ पुढे हेच नातेवाईकच काेराेनाचे वाहक ठरत आहेत़ त्यामुळे जिल्ह्यात समूह संसर्ग हाेत असल्याचे चित्र आहे़ रुग्णांना भेटायला येणारे किंवा जेवणाचे डबे घेऊन येणाऱ्यांनी विलगीकरणात राहण्याची गरज आहे़ काेराेनाचा नवीन संसर्ग पसरण्याची तीव्रता जास्त आहे़ कमी वेळात जास्त लाेकांना संक्रमित करताे़ त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे हीच काळाची गरज आहे़
वेळेवर तपासणी आणि उपचार आवश्यक
अनेक रुग्ण काेराेना झाल्यानंतर समाजात बदनामी आणि भीतीपाेटी घरीच उपचार करीत आहेत़ समाज माध्यमावर आलेल्या संदेशातून हे उपचार घेतले जात आहेत़ मात्र, त्यामुळे, रुग्ण गंभीर हाेत आहे़ काेराेना विषाणू रुग्णांच्या फुफ्फुस आणि रक्तावर हल्ला करताे़ त्यामुळे, याेग्य वेळीच तपासणी करून तज्ज्ञ डाॅक्टरांकडून उपचार करून घेणे गरजेचे आहे़
डाॅ़ किशाेरकुमार बिबे, वैद्यकीय अधिकारी, प्रा़ आ़ डाेणगाव