प्रिंप्री खंदारे येथील हाॅटेलात ताेडफाेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:30 AM2021-01-17T04:30:14+5:302021-01-17T04:30:14+5:30

बिबी (बुलडाणा) : बीट जमदारासह तंटामुक्ती अध्यक्षाने हाॅटेलात हैदाेस घालून साहित्याची ताेडफाेड केल्याची घटना १५ जानेवारी पिंप्री खंदारे ...

Tadfad at the hotel at Primpri Khandare | प्रिंप्री खंदारे येथील हाॅटेलात ताेडफाेड

प्रिंप्री खंदारे येथील हाॅटेलात ताेडफाेड

Next

बिबी (बुलडाणा) : बीट जमदारासह तंटामुक्ती अध्यक्षाने हाॅटेलात हैदाेस घालून साहित्याची ताेडफाेड केल्याची घटना १५ जानेवारी पिंप्री खंदारे शिवारात घडली. याप्रकरणी बिबी पाेलिसांनी बीट जमादार, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष व अन्य काही जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, पाेलिसांनी १६ जानेवारी राेजी हाॅटेलमालकासह इतराविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

लक्ष्मीबाई दत्तराव वायाळ यांनी बिबी पाेलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पिंप्री खंदारे येथील तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष शे. हबीब, बिबी पाेलीस ठाण्याचे बीट जमादार शे.आसीफ शे.मेहमूद , एकनाथ ऊर्फ बद्री नामदेव चाैधरी, शे.वसीम शे.हबीब व शे.हबीब यांचा भाचा यांनी मटन बनवण्यावरून वाद घातला. तसेच हाॅटेलमधील १० फायबर खुर्च्या, ३ फायबर टेबल फरशीवर आदळून ताेडफाेड केली. यामध्ये १४ हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच सर्वच जण मद्य प्राशन करून आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी बिबी पाेलिसांनी सातही जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ठाणेदार तावरे करीत आहेत. याप्रकरणी ठाणेदार तावरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी काॅल रिसिव्ह केला नाही.

हाॅटेलमालकासह सात जणांविरुद्ध गुन्हा

याप्रकरणी शेख हबीब शेख छाेटू यांनी बिबी पाेलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मटन तयार करण्यावरून अमाेल आडे, लक्ष्मीबाई दत्ताराव वायाळ, गजानन दत्ताराव वासयाळ, कृष्णा शेरे, राजू गव्हाळ, विकी राठाेड यांनी वाद घातला. तसेच गैरकायदेशीर मंडळी गाेळा करून अश्लील शिवीगाळ केली व चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी सात जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Tadfad at the hotel at Primpri Khandare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.