भास्कर जाधव यांच्यावर कारवाई करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:36 AM2021-07-27T04:36:32+5:302021-07-27T04:36:32+5:30

शिवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूण येथे मुख्यमंत्र्यांसमक्ष एका संकटग्रस्त महिलेस अपमानास्पद वागणूक दिली. सरकारकडून मदतीची अपेक्षा करू ...

Take action against Bhaskar Jadhav! | भास्कर जाधव यांच्यावर कारवाई करा!

भास्कर जाधव यांच्यावर कारवाई करा!

Next

शिवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूण येथे मुख्यमंत्र्यांसमक्ष एका संकटग्रस्त महिलेस अपमानास्पद वागणूक दिली. सरकारकडून मदतीची अपेक्षा करू नये, असाच त्यांच्या उद्दाम वागण्याचा इशारा होता, हे त्या प्रसंगाच्या व्हिडिओमधून राज्यभरातील जनतेस कळून चुकले आहे. मुख्यमंत्र्यांदेखत असा उद्दामपणा करूनही त्यांना कोणतीच समज न देता उलट त्यांच्याच इशाऱ्यावरून तेथून काढता पाय घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांच्या वागण्याचे समर्थन केले, असा आरोप आमदार श्वेता महाले यांनी केला. संपूर्णपणे उद्‌ध्वस्त झालेल्या संकटग्रस्तांना तातडीची मदत देणे दूरच, मदतीची घोषणादेखील न करता हात हलवत परतणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी भास्कर जाधव यांच्या माध्यमातून बेजबाबदारपणाचे जाहीर दर्शन घडविले आहे. मुख्यमंत्र्यांनीच महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, असे आ. महाले यांनी स्पष्ट केले आहे. भास्कर जाधव यांच्या उद्दाम वर्तणुकीचे अनेक दाखले याआधीही महाराष्ट्रास मिळाले असतानाही मुख्यमंत्री सातत्याने त्यांची पाठराखण करतात. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आशीर्वादानेच आमदार जाधव यांचा उद्दामपणा वाढला आहे, असा आरोपही आ.महाले यांनी केला आहे.

..अन्यथा, आंदोलन

आमदार जाधव यांनी राज्यातील महिलांची माफी मागावी व मुख्यमंत्र्यांनी त्वरित कठोर कारवाई करावी, अशी मागणी आ. महाले यांनी केली आहे. दरम्यान, जाधव यांच्यावर कारवाई न झाल्यास राज्यभरातील महिला आंदोलन करतील, असा इशाराही आ. महाले यांनी दिला आहे.

Web Title: Take action against Bhaskar Jadhav!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.