भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्या! - आमदार आकाश फुंडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 02:14 PM2018-07-17T14:14:56+5:302018-07-17T14:16:33+5:30

राज्य मंत्रीमंडळाने महत्वाचा निर्णय घेत त्यांच्या नावाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला.

Take advantage of Bhausaheb Phundkar Horticulture Planting Scheme! - MLA Akash Phundkar | भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्या! - आमदार आकाश फुंडकर 

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्या! - आमदार आकाश फुंडकर 

Next
ठळक मुद्देशेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन खामगांव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी केले आहे. कोकणात १० हेक्टर तर उर्वरीत महाराष्ट्रात ६ हेक्टर पर्यंत शेतकरी या योजनेचा लाभ घेवू शकतात.

 

लोकमत न्युज नेटवर्क 
खामगाव :  आपले संपुर्ण आयुष्य शेतकरी हितासाठी झटणारे भाजपाचे दिवंगत ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी कृषीमंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांचे कार्य सदैव स्मरण रहावे तसेच शेतकºयांचे हित व्हावे यासाठी राज्य मंत्रीमंडळाने महत्वाचा निर्णय घेत त्यांच्या नावाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला. या योजनेची तातडीने अंमलबजावणी करीत नुकतेच राज्य सरकारच्या कृषी विभागाने शेतकºयांकडून उपरोक्त योजनेतून लाभ घेण्यासाठी अर्ज मागविले आहेत. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन खामगाव मतदार संघाचे आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी केले आहे. 
स्व.भाऊसाहेब फुंडकर यांनी आपले संपुर्ण आयुष्य शेतकरी हितासाठी खर्चीले, त्यांचे कार्य अफाट आहे.  त्यांच्या निधनानंतर त्यांचे कार्य सदैव स्मरणात रहावे यासाठी राज्यातील फळ बागायतदार शेतकरी अधिकाधिक झपाट्याने विकसीत व्हावा, त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी राज्याच्या मंत्रीमंडळाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राज्यात राबविण्याचा महत्वाकांक्षी निर्णय काही दिवसापुर्वीच घेतला आहे.  या योजनेची जाहीरात आज प्रकाशीत करण्यात आली  या योजनेत फळबांगांच्या लागवडीसाठी शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतक-याकडून  अर्ज मागविण्यात आले आहेत. खामगांव मतदार संघातील शेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन खामगांव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी केले आहे. या योजनेमध्ये आंबा, डाळींब, काजु, पेरू, सिताफळ, आवळा,  चिंच, जांभुळ, कोकम, फणस,कागदी लिंबु, चिकु, संत्रा, मोसंबी, अंजीर व नारळ या फळांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच कोकणात १० हेक्टर तर उर्वरीत महाराष्ट्रात ६ हेक्टर पर्यंत शेतकरी या योजनेचा लाभ घेवू शकतात. याबाबतचा संपुर्ण विस्तृत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आला आहे.  ह्यभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनाह्णया नव्या योजनेमुळे स्व.भाऊसाहेबांच्या स्वप्नांप्रमाणे शेतकºयांचा खरा विकास होऊन शेतकरी स्वावलंबी व्हावे यासाठी शेतक-यांनी अर्ज सादर करावे असे आवाहन आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी केले आहे.

Web Title: Take advantage of Bhausaheb Phundkar Horticulture Planting Scheme! - MLA Akash Phundkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.