उत्सव काळात कोरोनाने जीव जाणार नाही याची दक्षता घ्या : अरविंद चावरिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:38 AM2021-09-05T04:38:36+5:302021-09-05T04:38:36+5:30

स्थानिक संत सावतामाळी भवनमध्ये २ सप्टेंबर रोजी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला अपर जिल्हा पोलीस ...

Take care that corona does not die during the festival: Arvind Chawria | उत्सव काळात कोरोनाने जीव जाणार नाही याची दक्षता घ्या : अरविंद चावरिया

उत्सव काळात कोरोनाने जीव जाणार नाही याची दक्षता घ्या : अरविंद चावरिया

Next

स्थानिक संत सावतामाळी भवनमध्ये २ सप्टेंबर रोजी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला अपर जिल्हा पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, प्रभारी तहसीलदार खाडे, नायब तहसीलदार वीर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ व चिखली पोलीस ठाण्याला नव्याने रुजू होणारे पोलीस निरीक्षक अशोक लांडे उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या पृष्ठभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी गणेश मंडळांनी गतवर्षाप्रमाणेच यावर्षीही गणेशोत्सवासंदर्भाने नियमावलींचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याबाबत आवाहन केले. चिखली पोलीस ठाण्याचे मावळते ठाणेदार गुलाबराव वाघ यांचा हृद्यसत्कार तर नव्याने रुजू झालेले ठाणेदार अशोक लांडे यांचे स्वागत यावेळी करण्यात आले. प्रा. अनंत चेके यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी चिखली पोलीस ठाणे, गणेश मंडळाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी, पोलीस पाटील उपस्थित होते. बैठकीसाठी गोपनीय शाखेचे बाहेकर, शरद गिरी, कोहेकर काकड यांनी पुढाकार घेतला.

ठाणेदार वाघ यांचे कार्य प्रशंसनीय

ठाणेदार गुलाबराव वाघ यांनी चिखलीसारख्या मोठ्या पोलीस ठाण्यांतर्गत सलग तीन वर्षे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखतानाच गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यात यश मिळविले आहे. दोन जन्मठेप व एक फाशीची शिक्षा त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारांना मिळाली आहे. चिखलीत बंदोबस्तासाठी कधीही येण्याची गरज त्यांच्या कार्यकाळात भासली नाही, असे सांगत चावरिया यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. दरम्यान, ठाणेदार वाघ यांच्या कार्याचा वारसा यापुढेही कायम राहील असा विश्वास यावेळी बोलताना नव्याने रुजू झालेले ठाणेदार अशोक लांडे यांनी आभार प्रदर्शनादरम्यान व्यक्त केला.

Web Title: Take care that corona does not die during the festival: Arvind Chawria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.