लसीकरणापासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:32 AM2021-03-24T04:32:48+5:302021-03-24T04:32:48+5:30
चिखली : केंद्र सरकारने सर्वांसाठी मोफत कोविड प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून दिलेली असून ६० वर्षांवरील तसेच ४५ ते ६० ...
चिखली : केंद्र सरकारने सर्वांसाठी मोफत कोविड प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून दिलेली असून ६० वर्षांवरील तसेच ४५ ते ६० वर्षापर्यंत दुर्धर आजारग्रस्त नागरीकांना सध्या लस दिल्या जात आहे. याअंतर्गत पात्र असलेले कोणतेही नागरिक लसीकरणापासून वंचित राहू नये, याची दक्षता घ्यावी व सर्वांनी जबाबदारीने कार्य करावे, अशा सूचना आमदार श्वेता महाले पाटील चिखली शहर आणि ग्रामीण भागातील लसीकरण आढावा बैठकीत दिल्या.
तहसिल कार्यालयात २२ मार्च रोजी चिखली शहर व तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आ.महाले यांनी लसीकरणाचा आढावा घेतल्यानंतर आवश्यक सूचना दिल्या. दरम्यान नगरपालिका क्षेत्रात ६० वर्षावरील तथा दुर्धर आजारग्रस्त नागरिकांची लसीकरण केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी प्रभागनिहाय वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याची व्यवस्था नगरसेवक आणि पालिकेने संयुक्तिकपणे करावी, तथापि व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी ऑटो व इतर प्रकारे जाहिरात करून सर्व माहीती नागरिकांना देण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन देखील आ.श्वेता महाले यांनी केले. बैठकीला पं.स.सभापती सिंधु तायडे, नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे, प.स.उपसभापती शमशाद पटेल, डॉ.कृष्णकुमार सपकाळ, पंडितराव देशमुख, पं.स.सदस्य जितेंद्र कलंत्री, मानिषा सपकाळ, नगरसेवक अ.रफिक, नंदु कºहाडे, शैलेश बाहेती, तहसीलदार डॉ.अजित येळे, मुख्याधिकारी अभिजित वायकोस, गटविकास अधिकारी जाधव, नगरसेवक गोविंद देव्हडे, ममता बाहेती, प्रा.डॉ.राजू गवई, कुणाल बोंद्रे, दीपक खरात, मो.असिफ, रघुनाथ कुलकर्णी, शैलेश बाहेती, डॉ.मनीषा खेडेकर, यांच्यासह मंडळ अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.