सातबारा दुरुस्तीसाठी गावनिहाय शिबिर घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:24 AM2021-06-26T04:24:13+5:302021-06-26T04:24:13+5:30
डॉक्टर देता का डॉक्टर? बुलडाणा: जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरांची रिक्त पदे आहेत. ग्रामीण भागात डॉक्टर मिळत नसल्याने नागरिकांना ...
डॉक्टर देता का डॉक्टर?
बुलडाणा: जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरांची रिक्त पदे आहेत. ग्रामीण भागात डॉक्टर मिळत नसल्याने नागरिकांना उपचारासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे कुणी डॉक्टर देता का डॉक्टर, असे म्हणण्याची वेळ ग्रामीण भागातील नागरिकांवर आली आहे.
संकट गेल्यावर मिळते माहिती
बुलडाणा: शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरावी, म्हणून शेतकऱ्यांसाठी किसान ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे, परंतु वादळ, वारे येऊन गेल्यावर या संकटाची माहिती किसान ॲपवर शेतकऱ्यांना दिली जात आहे.
आंबे उतरविण्याला वेग
हिवर आश्रम: सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून, आता गावरान आंबे, कैऱ्या उतरविण्याच्या कामाला वेग आला आहे. कैरीचे लोणचे बनविण्याचे काम घरोघरी सुरू असून, सध्या बाजारातही कैऱ्यांची आवक वाढली असल्याचे दिसून येते.
लिंबाचे दर घसरल्याने उत्पादक चिंतेत
बीबी: उन्हाळ्यात लिंबाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते, त्यामुळे लिंबाचे दरही गगणाला भिडलेले असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून १० रुपयाला १५ ते २० लिंबू मिळत आहेत. लिंबाचे दर घसरल्याने उत्पादक चिंतेत आहेत.