‘जीएसटी’संदर्भात आज उद्योजकांशी चर्चा

By admin | Published: July 12, 2017 12:54 AM2017-07-12T00:54:24+5:302017-07-12T00:54:24+5:30

काँग्रेसचे अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती

Talk to entrepreneurs today about 'GST' | ‘जीएसटी’संदर्भात आज उद्योजकांशी चर्चा

‘जीएसटी’संदर्भात आज उद्योजकांशी चर्चा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: केंद्र सरकारने जीएसटी धोरण संदर्भात संभ्रमावस्था निर्माण केल्याने व्यापार उद्योगात विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणींमुळे लघु, मध्यम व मोठे व्यापारी तसेच जनता व ग्राहक संभ्रमावस्थेत सापडला आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी व व्यापारी उद्योजक यांच्या भावना समजावून घेण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत १२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन केले आहे.
शेतकऱ्यांना त्यांचे न्याय्य हक्क पदरात पाडून घेण्यासाठी, त्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासाठी काँग्रेस पक्षाने आंदोलनाचे शस्त्र तीव्र केले आहे. शासनाने नुकतीच घोषित केलेली फसवी कर्जमाफी विरोधात काँग्रेसने एल्गार पुकारीत १२ जुलै रोजी बुलडाण्यात खा.अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने अ.भा.काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, अ‍ॅड. गणेशराव पाटील, संजय चैपाणे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी श्याम उमाळकर, संजय राठोड, विजय अंभोरे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, जनूभाऊ बोंद्रे, बाबूराव पाटील, लक्ष्मणराव घुमरे, अरविंद कोलते, रामविजय बुरुंगले, मुख्त्यारसिंग राजपूत, प्रकाश धुमाळ, अंजली टापरे, मीनल आंबेकर, जयश्री शेळके, दिलीप जाधव, डॉ.तब्बसुम हुसेन, वर्र्षा वनारे, मनोज कायंदे, प्रकाश पाटील, प्रा. नरेंद्र खेडेकर, बाळाभाऊ भोंडे, अलका खंडारे, अंकुशराव वाघ, गणेश बस्सी, बलदेवराव चोपडे, संतोष पाटील, हाजी रशिदखा जमादार, तेजेंद्रसिंह चैव्हाण, प्रमोद अवसरमोल, मो. वसिम, रमेश घोलप, गितेश पाटील, आदी नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपस्थितीचे आवाहन आमदार राहुल बोंद्रे, आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

Web Title: Talk to entrepreneurs today about 'GST'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.