सिंदखेडराजा: दोन दिवस रंगणार तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 05:22 PM2017-12-15T17:22:44+5:302017-12-15T17:25:17+5:30
सिंदखेडराजा: तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन रुम्हणा येथील कै. तुकाराम कायंदे विद्यालयात २० व २१ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.
सिंदखेडराजा: तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन रुम्हणा येथील कै. तुकाराम कायंदे विद्यालयात २० व २१ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. यासंदर्भात१२ डिसेंबर रोजी रुम्हणा येथील कै. तुकाराम कायंदे विद्यालयात प्राचार्य काशीनाथ काकड यांच्या अध्यक्षतेखाली, तालुका विज्ञान शिक्षक संघटनेचे अध्यक्ष दीपक नागरे, संस्थेचे सचिव आत्माराम कायंदे, सहसचिव शिवराज कायंदे, केंद्र प्रमुख बुधवत, विज्ञान विषय तज्ञ प्रविण गवई, विवेक रामपूरकर, दिलीप काकडे, दीपक पाटील, रामदास कायंदे, श्रीराम भोसले, अक्षय खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. सदर विज्ञान प्रदर्शनीमध्ये शाश्वत विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम या मुख्य विषयांतर्गत आरोग्य, संसाधन व्यवस्थापन आणि अन्नसुरक्षा, कचरा व्यवस्थापन आणि जलाशयाचे संरक्षण, वाहतूक व दळणवळण, डिजिटल व तांत्रिक समाधान, गणितीय प्रतिकृती या उपविषयांवर तालुकाभरातील विद्यार्थी प्रदर्शनीय वस्तू, प्रतिकृती, वैज्ञानिक प्रकल्प सादर करतील. प्रदर्शनीदरम्यान निबंध स्पर्धेत इयत्ता ६ वी ते ८ वी साठी पर्यावरण संवर्धन काळाची गरज, प्रदूषण एक समस्या, लोकसंख्येचा भस्मासुर व पर्यावरणीय ºहास तर इयत्ता ९ वी ते १२ वी साठी माहिती तंत्रज्ञानाचे विज्ञानातील योगदान, आजचा विद्यार्थी: ज्ञानार्थी की परीक्षार्थी, राष्ट्रीय विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हे विषय ठेवण्यात आले आहेत. दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनासाठी तालुक्यातील सर्व उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी सहभागी होण्याचे आवाहन पं. स. च्या शिक्षण विभागातर्फे गट शिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)