बुलडाणा जिल्ह्यात अखेर घरकुलांचे तालुकानिहाय वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 12:19 PM2020-11-23T12:19:53+5:302020-11-23T12:20:04+5:30
९२२४ पैकी ८६०१ घरकुलाचे तालुकानिहाय वाटप अखेर शुक्रवारी करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : गेल्या तीन वर्षात प्रथमच प्रधानमंत्री घरकुल याेजनेसाठी जिल्ह्याला पुरेशा संख्येत घरकुलांना मंजूरी मिळाली आहे. जिल्ह्यासाठी असलेल्या ९२२४ पैकी ८६०१ घरकुलाचे तालुकानिहाय वाटप अखेर शुक्रवारी करण्यात आले. त्यापैकी ३ टक्के घरकुले अपंगासाठी राखीव आहेत. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते.
केंद्र शासनाने सर्वांना घरे हा उपक्रम २०१७ पासून सुरू केला. मात्र, सुरूवातीच्या वर्षात पुरेशा घरकुलांना मंजूरी मिळाली नाही. त्यामुळे प्रतिक्षा यादीतील लाभार्थी, दिलेला लक्षांक, मंजूर संख्या तसेच कामाची गती पाहता ठरलेल्या कालावधीत सर्वांनाच घरे मिळण्याची शक्यता मावळली. त्यातच गेल्या तीन वर्षात मंजूर घरकुलांपैकी केवळ ६० टक्के पूर्ण झाली आहेत. ४० टक्के घरकुले अपूर्ण असून त्यापुढील लाभार्थींसाठीचा लक्षांकही
मार्च २०२० अखेरपर्यंत प्राप्त झालेला नव्हता. त्यामध्ये केंद्र शासनाची प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, राज्याची रमाई आवास, शबरी, पारधी आवास योजनांचा समावेश आहे. दरम्यान, १० आँक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण कक्षाकडून जिल्ह्यांना लक्षांक देण्यात आलेले आहेत.